वैनगंगा नदीत आत्महत्या करण्यासाठी उडी घेतलेल्या रुग्णाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:24 AM2018-09-05T10:24:40+5:302018-09-05T10:25:46+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाने आजाराला कंटाळून वैनगंगा नदीत उडी घेतली. मात्र त्या ठिकाणी पोहण्याचा सराव करणाऱ्या तरूणाने त्याला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाने आजाराला कंटाळून वैनगंगा नदीत उडी घेतली. मात्र त्या ठिकाणी पोहण्याचा सराव करणाऱ्या तरूणाने त्याला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. ही घटना कारधा पुलावर बुधवारी सकाळी ७ वाजता घडली.
कृष्णा आनंद मारवाडे रा. खमारी असे नदीपात्रात उडी घेतलेल्याचे नाव आहे. तो येथील सामान्य रुग्णालयात दोन महिन्यापासून उपचार घेत आहे. आजाराला कंटाळल्याने त्याने बुधवारी सकाळी रूग्णालयातून पळ काढला व थेट वैनगंगा नदी गाठली. तेथील कारधा पुलावरून त्याने नदीत पात्रात उडी घेतली. त्यावेळी बाजूलाच कॅनॉइंग अँड कयाकिंग असोसिएशनचा जलतरणपटू अविनाश निंबार्ते सराव करीत होता. त्याला हा प्रकार दिसताच धाव घेतली. त्याने इतरांच्या मदतीने कृष्णाला बाहेर काढले.