सहायक कामगार आयुक्तांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:01 PM2018-11-21T22:01:16+5:302018-11-21T22:01:45+5:30
जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांचे सहा वर्षातील लाभाचे हजारोच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहे. याला सहायक कामगार आयुक्त भंडारा कारणीभूत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांचे सहा वर्षातील लाभाचे हजारोच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहे. याला सहायक कामगार आयुक्त भंडारा कारणीभूत आहे.
त्यामुळे अकार्यक्षम सहायक कामगार आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. सन २०१२ ते आजपर्यंत भंडारा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे हजारोच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहेत.
त्यामुळे कामगारांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. याला कारणीभूत सहायक कामगार आयुक्त आहेत. ६ आॅगस्ट २०१८ रोजी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये ३१ आॅगस्टपर्यंत संपूर्ण प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
परंतु सहायक कामगार आयुक्तांनी त्या परिपत्रकाची अंमलबजावणी न करता त्या निर्देशाची अवमानना केली आहे. परिणामी हजारो कामगारावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. सन २०१२ ते आजपर्यंतच्या लाभाचे प्रकरण त्वरीत निकाली काढण्यात यावे. सहायक कामगार आयुक्ताच्या अकार्यक्षम प्रणालीची चौकशी करून त्यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे, भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कामगार मंडळाची कार्यलय स्थापित करून कामगारांना सुविधा देण्यात यावे, अशी मागणी आहे. सदर मागण्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा काँग्रेस असंघटीत कामगार संघटनेचे अध्यक्ष मार्कंड भेंडारकर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, बांधकाम सभापती प्रेम वनवे, महिला व बाल कल्याण सभापती रेखा वासनिक, अनिक जमा पटेल, सुभाष आजबले, अशोक कापगते, अजय गडकरी, दिलीप कुंभारे, प्रशांत देशकर, कमलाकर निखाडे, लालू कटरे, मंगेश हुमणे, डॉ. विनोद भोयर, गणेश निमजे, जीवन भजनकर, किशोर हरडे, धनराज साठवणे, संजय वाघमारे आदींचा सहभाग होता.