खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा

By Admin | Published: May 11, 2016 12:51 AM2016-05-11T00:51:07+5:302016-05-11T00:51:07+5:30

येरली येथील सीमेंट रस्ता बांधकामात अनियमितता प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती न करता ...

Suspend the Department of Development | खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा

खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा

googlenewsNext

येरली येथील सिमेंट रस्ता प्रकरण : तांत्रिक अधिकाऱ्याऐवजी विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती
तुमसर : येरली येथील सीमेंट रस्ता बांधकामात अनियमितता प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती न करता विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती खंडविकास अधिकाऱ्यांनी केली. मागील चार महिन्यांपासून चौकशीचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदर प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
येरली येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आनंदराव रहांगडाले ते सूरजलाल पारधी यांच्या घरापर्यंत सीमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले.
६० मिटर पैकी ४२ मिटर बांधकाम करण्यात आले. १८ मिटर रस्ता बांधकाम केला नाही. कामाचा कालावधी १८ मार्च २०१४ ते २३ एप्रिल २०१४ असा होता. दि. २४ एप्रिल २०१४ ला काम पूर्ण झाल्याची नोंद पुस्तिकेत आहे. परंतु प्रस्तावित जागेवर केवळ ४२ मीटर रस्ता बांधकाम करण्यात आले. १८ मिटर रस्ता प्रस्तावित जागेवर नाही.
या रस्ता बांधकामाची अंदाजपत्रकीय किंमत २०२१०० खर्च झालेली रक्कम १९७७६४ आहे. येथे अंतिम देयकाची उचल करण्यात आली. सदर रस्त्याची ग्रामस्थांनी तक्रार केल्यावर खंडविकास अधिकाऱ्यांनी चौकशीकरिता तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता विस्तार अधिकारी राजूरकर यांची नियुक्ती केली. चार महिन्यापासून चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत आला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
कर्तव्यात कसूर व दप्तरदिरंगाई प्रकरणी संबंधित खंडविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे यांनी केली तथा येरली येथील सिमेंट रस्ता प्रकरणी जिल्हास्तरीय तांत्रिक अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची मागणीही मुन्ना पुंडे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

दोन्ही माजी आमदारांनी राजकारण करू नये
तुमसर तालुक्यात सिंचन प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, परंतु त्यांना शेतीचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. आ.चरण वाघमारे यांनी शासनाकडून मुबलक निधी आणून सरळ खरेदी प्रक्रियेतून जमिनीचा मोबदला मिळवून दिला. लाभ क्षेत्रातील ५०० एकर जमिनीवर सुक्ष्मसिंचन योजना लवकरच कार्यान्वित होत आहे. माजी आ.अनिल बावनकर व माजी आ.मधुकर कुकडे यांनी राजकारण करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे हित समजले असते तर शेतकऱ्यांकरिता भरीव मदत त्यांच्या कार्यकाळात केली असती. बघेडा, कारली, सोरणा, आंबागड, नागठाणा जलाशयात बावनथडीचे पाणी आ.वाघमारे यांच्या प्रयत्नामुळेच झाले. बावनथडी प्रकल्पातून त्यांच्या कार्यकाळात केवळ पाच हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळाले तर सध्या ११ हजार हेक्टर शेतीला पाणी सोडण्यात आले. विद्यमान आमदारावर आरोप करणाऱ्या माजी आमदारांनी पुरावे सादर करून बोलावे. असे भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पटले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला माजी पं.स. सभापती कलाम शेख, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमर टेंभरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर उपस्थित होते.

Web Title: Suspend the Department of Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.