दोन कृषी केंद्राचे परवाने निलंबित
By admin | Published: December 23, 2015 12:32 AM2015-12-23T00:32:32+5:302015-12-23T00:32:32+5:30
कृषी केंद्रातून बियाणे व खतांची विक्री करीत असताना केंद्र संचालकांनी त्या संबंधीची माहिती अद्ययावत ठेवली नाही
कृषी विभागाची कारवाई : कृषी केंद्र संचालकांना अनियमितता भोवली
भंडारा : कृषी केंद्रातून बियाणे व खतांची विक्री करीत असताना केंद्र संचालकांनी त्या संबंधीची माहिती अद्ययावत ठेवली नाही. या अनियमिततेप्रकरणी कृषी विभागाने लाखांदूर तालुक्यातील दोन कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत.
यात मासळ येथील पुरुषोत्तम लांजेवार यांचे लक्ष्मी कृषी केंद्र व सोनी येथील योगेश एंचिलवार यांचे शिवगौरी कृषी केंद्र निलंबित करण्यात आले आहेत. या केंद्रांची तपासणी केली असता उगम प्रमाणपत्रांची परवान्यात नोंद न घेता परस्पर साठा विक्री करणे, बिल बुकामध्ये तफावत असणे, दस्तावेज बरोबर न ठेवणे आदी त्रुट्या आढळून आल्या. त्यामुळे दोन्ही केंद्रावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)