सुलोचनादेवी पारधी विद्यालय मोहाडीचे सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:51+5:302021-07-26T04:31:51+5:30
मोहाडी : शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२१ चा निकाल जाहीर झाला. यात मोहाडी येथील सुलोचनदेवी पारधी विद्यालयाचे २१२ ...
मोहाडी : शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२१ चा निकाल जाहीर झाला. यात मोहाडी येथील सुलोचनदेवी पारधी विद्यालयाचे २१२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. यात कुमारी खुशबू हरिचंद्र बंधाटे ९६ टक्के, मधुरा विनोद गभने ९४.६० टक्के, सृष्टी किशोर बोंद्रे ९४ टक्के, शर्वरी गरफडे ९२.८० टक्के, संकेत वाडिभस्मे ९१.८० टक्के, प्रभुता शेंडे ९१.४० टक्के, प्रतीक्षा पिकलमुंडे ९०.६० टक्के, सलोनी बिरणवार ९१.८०, धनश्री पिकलमुंडे ९०.२० टक्के, तनुश्री येळणे ९० टक्के गुण घेऊन गुणवत्ता यादीत झळकले, तर १३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. सर्व गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक अविनाश चौधरी यांनी कौतुक केले, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नारायणराव तितिरमारे, सचिव शरद तितिरमारे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.