अल्पवयीन मुलाला पाठविले स्वगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:53+5:302021-07-23T04:21:53+5:30
२२ लोक ०५ के भंडारा : एका वाट चुकलेल्या व घाबरलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी करून त्याला आर्थिक मदत देऊन ...
२२ लोक ०५ के
भंडारा : एका वाट चुकलेल्या व घाबरलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी करून त्याला आर्थिक मदत देऊन पोलिसांच्या मदतीने त्याला स्वगावी पाठविण्यात आले. आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांच्या पुढाकाराने या मुलाला त्याच्या स्वगावी जाता आले.
एक अल्पवयीन मुलगा चुकून भंडारा शहरातील बसस्थानकात आला. तीन ते चार दिवसांपासून तो घाबरलेल्या स्थितीत वावरत होता. याची माहिती आदर्श युवा मंचचे पवन मस्के यांना मिळाली. बसस्थानक गाठून घाबरलेल्या मुलाची चौकशी केली. त्याचे नाव, गाव काय हे काहीही सांगण्यास तो असमर्थ होता. शेवटी मस्के यांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. त्याला घरी जाण्यास मदत व्हावी म्हणून त्याची चौकशी करून शहानिशा करण्यात आली. मुलगा घरचा रस्ता चुकला होता. चौकशीनंतर तो बालाघाट येथील रहिवासी असून त्याचे नाव आकाश नेवारे आहे. त्याच्याजवळ गावी जायला पैसेही नव्हते. आकाश हा तीन दिवसांपासून उपाशी होता. पवन मस्के यांनी त्याला जेवण खाऊ घातले. तसेच आर्थिक मदत करून बालाघाटला जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसवून त्याला स्वगावी रवाना केले. मंचच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय यातून समोर आला. याप्रसंगी अशोक खोब्रागडे, मनोज पाठक, फरदीन खान, जयेश परंदकर आदी उपस्थित होते.