आदिवासीचे पुनर्वसित गावातून स्वगावी पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 10:31 PM2017-10-05T22:31:08+5:302017-10-05T22:31:18+5:30

बावनथडी प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या आदिवासी बहुल कमकासुर गावाचे पुनर्वसन शासनाने बंदुकीच्या नोकावर तालुक्यातील रायपूर नजीकच्या टोलीवर केले.

Swargane escape from the tribal's rehabilitated town | आदिवासीचे पुनर्वसित गावातून स्वगावी पलायन

आदिवासीचे पुनर्वसित गावातून स्वगावी पलायन

Next
ठळक मुद्देप्रशासनात खळबळ : जगणे झाले होते कठीण

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या आदिवासी बहुल कमकासुर गावाचे पुनर्वसन शासनाने बंदुकीच्या नोकावर तालुक्यातील रायपूर नजीकच्या टोलीवर केले. मात्र पुनर्वसन झाल्यापासून ते आजपर्यंत शासनाने वीज, पाणी, धान्य, रोजगार, शिक्षण सारखी कोणती नागरी सुविधा न पुरविल्याने त्या ठिकाणी आदिवासीचे जगणे कठीण झाले होते. परिणामी आता मरण आले तरी बेहतर परंतु स्वगावीच जायचे असे एकमत झाल्याने पुनर्वसित कमकासूरवासीयांनी त्या गावातून लेकराबाळासह गुरूवारी स्वगावी पलायन करताच प्रशासनात एकच खळबळ माजली.
बावनथडी प्रकल्पाची गळभरणी करते वेळी कमकासूर येथील आदिवासीयांना कोणताही मोबदला आधी न देता बंदुकीच्या नोकावर सळो की पळो करीत बळजबरीने आदिवासीयांना गावाबाहेर काढले. ज्या पद्धतीने, त्यांना गावाबाहेर काढले त्या पद्धतीनेच शासनाने त्यांच पुनर्वसन करून आवश्यक ती सुविधा पुरविणे गरजेचे होते. मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे त्यांना टिनाच्या शेडमध्ये जीवन जगावे लागले. रायपूर नजीक करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात सुरुवातीपासूनच विद्युतची व्यवस्था नाही. सुसुरडोह गट ग्रा.पं. मध्ये येत असलेला कमकासूर हे गाव १५ कि.मी. अंतरावर असल्याने ग्रा.पं. चे दुर्लक्ष होते आहे. इतकेच नव्हे तर स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे स्वस्तात मिळत नाही. गावातील नाल्याचे कधीच उपसा होत नसल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. कमकासूर हे गाव १०० टक्के आदिवासी आहे. कायद्यानुसार आदिवासी यांना भूमीहीन करता येत नाही. पुनर्वसन झालेल्या आदिवासीयांना बेघर व भूमीहीन बनविले आहे. त्यांना कोणत्याही जमिनीचे पट्टे देण्यात आले नाही.

पुनर्वसन गावातही रानटी प्राण्यांच्या दहशतीतच जीवन जगत आलो. पलायनानंतरही झाडांच्या आडोशाला संसार थाटून कमीत कमी जीवन जगू.
-किशोर उईके, सरपंच, कमकासूर.
पुनर्वसन गावातून आदिवासींनी पलायन करू नये म्हणून मी लक्ष्मीकांत सलामे, अनिल टेकाम यांच्यासह गेलो. शासनाने आदिवासीयांच्या समस्येकडे त्वरीत लक्ष घालावे अन्यथा इथे प्रकरण वेगळे वळण घेऊ शकते.
-अशोक उईके, आदिवासी नेता व माजी जि.प. सदस्य.
महसूल विभागाचे कर्मचारी कमकासूर येथे पाठविले आहे.
-निलेश गौंड, ना.तहसीलदार तुमसर.

Web Title: Swargane escape from the tribal's rehabilitated town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.