भंडारा जिल्ह्यातला रानमेवा; चविष्ट खिरण्या आल्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 02:33 PM2019-04-19T14:33:16+5:302019-04-19T14:35:22+5:30
सिरसाळा गावाजवळच्या जंगलातील प्रसिद्ध रानमेवा खिरण्या बाजारात विक्रीला आले आहे. यावर्षी या रानमेव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: सिरसाळा गावाजवळच्या जंगलातील प्रसिद्ध रानमेवा खिरण्या बाजारात विक्रीला आले आहे. यावर्षी या रानमेव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा आहे.
पवनी वनपरिक्षेत्रात फक्त सिरसाळा गावाजवळच्या जंगलात रानमेवा ठरलेल्या खिरण्यांची झाडे आहेत. ही झाडे जाड, गर्द हिरव्या पानांनी झाकलेली असल्यामुळे या झाडाखाली मोठी थंडी असते. यामुळे वन्यप्राणीही या झाडाखाली उन्हाळ्यात विसावा घेतात. या झाडांना एप्रिल ते जून महिन्यात पिवळ्या रंगाची तांबोळी फळे येतात. ही फळे गोड, शीतल, बलवर्धक असल्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना या खिरण्या आवडतात. पवनी तालुक्यात फक्त याच जंगलात खिरण्यांची झाडे आहेत.
या खिरण्यांच्या झाडांचा लिलाव वनविभागातर्फे होतो. या जंगलातून २०० किलो खिरण्या निघत आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या हंगामात यावर्षी ३ लक्ष रुपयांच्या खिरण्या विक्री होण्याची अपेक्षा आहे. या खिरण्या दररोज बाजारात येत आहेत. तसेच जवाहरगेट परिसरात खिरण्यांची विक्री होत असून मोठ्या संख्यने पर्यटक या खिरण्यांचा आस्वाद घते आहेत.