स्वाईन फ्ल्यूू जनजागृती अभियान

By admin | Published: November 22, 2015 12:30 AM2015-11-22T00:30:45+5:302015-11-22T00:30:45+5:30

येथील समर्थ महाविद्यालयाच्या एनसीसी पथकातर्फे लेफ्टनंट प्रा. बाळकृष्ण रामटेके यांच्या नेतृत्वात एनसीसी कॅडेट्सनी स्वाईन फ्लू जनजागृती अभियान राबविण्यात आले.

Swine Flu Publications Campaign | स्वाईन फ्ल्यूू जनजागृती अभियान

स्वाईन फ्ल्यूू जनजागृती अभियान

Next


लाखनी : येथील समर्थ महाविद्यालयाच्या एनसीसी पथकातर्फे लेफ्टनंट प्रा. बाळकृष्ण रामटेके यांच्या नेतृत्वात एनसीसी कॅडेट्सनी स्वाईन फ्लू जनजागृती अभियान राबविण्यात आले.
लाखनी येथे आठवडी बाजाराच्या दिवशी फलक आणि हस्तपत्रकांचा वापर करीत सर्वसामान्य जनतेमध्ये स्वाईन फ्लू या गंभीर आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. आठवडी बाजारातील दुकानदारांना भाजीपाले, विक्रेते मिठाई विक्रेत्यांना स्वाईन फ्लू या आजाराविषयी सावध राहण्याचे आवाहन एनसीसी पथकाने केले. या जनजागृती अभियानात ५२ एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते.
एच-वन, एच-वन या विषाणूंमुळे होणारा स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार आहे. या आजाराने जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तुमसर तालुक्यात संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून स्वच्छता धुळ फवारणी करण्यात येत आहे. खोकलताना तोंडावर रूमाल ठेवावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, सर्दी, खोकला, ताप आल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. जिल्हा रुग्णालयात या आजारावरील औषधोपचार नि:शुल्क असून आजाराची लक्षणे आढळून आल्यास रुग्णालयात त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, आजारी व्यक्तीपासून दूर राहा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, दररोज फळे, भाजीपाला आहार घ्यावा. शांत झोप घ्यावी, स्वाईन फ्लू प्रसार ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी यात्रा करण्याचे टाळावे. डुकरांपासून या आजारांचे विषाणू पसरत असल्याने डुक्कर मालकांनी नागरी वसाहतीमध्ये असलेल्या डुकरांना शहराबाहेर काढण्याच्या सुचना पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. या अभियानाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या अभियानाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अभियानाकरिता उपप्राचार्य डॉ. राम आर्वीकर, प्रा. गिरीपुंजे, डॉ. भोवते, प्रा. मेश्राम, डॉ. कापसे, एनसीसी माजी कॅडेट्स सचिव पडोळे यांनी सक्रीय सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Swine Flu Publications Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.