प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:36 PM2018-05-25T22:36:40+5:302018-05-25T22:37:27+5:30

देशात पेट्रोल व डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे महागाईच्या दरात सातत्याने वाढ होत असून याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे.

The symbolic phantom trips were taken away from the petrol price hike | प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध

प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांचे नेतृत्त्व : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशात पेट्रोल व डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे महागाईच्या दरात सातत्याने वाढ होत असून याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी दुपारी १ वाजता गोंदिया येथे वाहनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा व सायकल रॅली काढण्यात आली. यात सहभागी सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सायकल रॅली व वाहनाच्या प्रतिकात्मक प्रेत यात्रेला सुरूवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर उपविभागीय कार्यालयात सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.
सायकल चालवून पटेलांनी केला निषेध
या रॅलीत खा.प्रफुल्ल पटेल हे स्वत: सायकल चालवित रॅलीत सहभागी झाल्याने या शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीत माजी आ.राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, शिव शर्मा, गप्पु गुप्ता, भय्यू चौबे, विनोद हरिणखेडे, हरगोंविद चौरासीया, निखिल जैन, केतन तुरकर, सोनू बिहारी, लखनसिंह बिहिरीया यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जीएसटीएस व सरकारच्या चुकीच्या करप्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. आम्ही सत्तेत असताना पेट्रोल, डिझेलचे दर प्रती बॅरेल १४० रुपये होते. आता हे दर ८० प्रती बॅरेल असूनही पेट्रोलचे दर प्रती लिटर ८६ रुपयांवर गेले आहे. त्यामुळे सामान्यांवर बोजा वाढत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी ही प्रतिकात्मक प्रेत यात्रा व सायकल रॅली काढली.
- खा.प्रफुल्ल पटेल,
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.

Web Title: The symbolic phantom trips were taken away from the petrol price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.