हॉटेल्समधील ‘तडका’ त्रासदायक
By admin | Published: June 20, 2016 12:28 AM2016-06-20T00:28:49+5:302016-06-20T00:28:49+5:30
वाहन चालविताना अचानक डोळ्यात तिखट गेल्याचा अनुभव अनेकांना येतो.
अनुभव : वाहनचालकांच्या डोळ्यांवर होतोय परिणाम
पवनी : वाहन चालविताना अचानक डोळ्यात तिखट गेल्याचा अनुभव अनेकांना येतो. मग, लगेच वाहन थांबवून डोळे चोळण्याशिवाय काही पर्याय नसतो. हे तिखट डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. हे तिखट त्याच मार्गावरील हॉटेलमधील असू शकते, अशा हॉटेलांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाची आहे.
याबाबत त्यांनी अनेकदा हॉटेल चालकांना सूचना दिल्या आहेत. मात्र, आजही शहरातील विविध मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना हा अनुभव येत आहेत. शहरातील वाढती वाहनाची संख्या प्रदूषणात भर टाकत आहे. हे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणारे आहे. यापासून दूर जाण्याचा प्रयत्न प्रत्येक वाहनचालक करतात. मात्र, आता हॉटेलमधील तिखटाचा तडका नागरिकांसाठी घातक ठरत आहे.
भरधाव वेगाने जाणारी वाहने अचानक ब्रेक दाबून थांबवावी लागतात. चालकाला डोळे चोळत काही वेळ वाट पहावी लागते. समोरचे स्पष्ट दिसू लागल्यानंतरच तो पुढे जाऊ शकतो. या प्रकाराचा अनुभव सायंकाळी वाहनचालक घेत आहेत. शहरातील विविध मार्गांवर हॉटेल्स, चायनिज सेंटर्सवर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. तिखटाचा वापर होतो. खाद्यपदार्थांची विक्री करताना अन्न व औषधी प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक असते. अन्न पदार्थ बनविताना उडणारे तेल व तिखटांचे बारीक कण उंचावर चिमणी लावून सोडण्याचा नियम आहे. (तालुका प्रतिनिधी)