पदस्थापनेची कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:01:33+5:30
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीने रिक्त झालेल्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे दिलेल्या रॅन्डम व विस्थापित झालेल्या शिक्षकांची विनंती बदली करण्याची मागणी आहे. भंडारा जिल्ह्यातील २६ शिक्षकांच्या जिल्ह्यात तर विभागीय आयुक्ताकडून आलेल्या पत्रानुसार तसेच रॅन्डम व विस्थापित झालेल्या शिक्षकांना संदर्भीय पत्रानुसार रिक्त झालेल्या ठिकाणी आधी समुपदेशन घेवून पदस्थापनेची कारवाई करण्याची मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आंतरजिल्हा बदलीने रिक्त झालेल्या ठिकाणी जिल्ह्यातील २६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे विभागीय आयुक्ताकडून आलेल्या तसेच रॅन्डम व विस्थापित झालेल्या शिक्षकांना रिक्त झालेल्या ठिकाणी आधी समुपदेशन घेवून पदस्थापना देण्याची कारवाई करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघ जिल्हा भंडारातर्फे करण्यात आली आहे.
या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना देण्यात आले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देत अन्य मागण्यांवरही चर्चा केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीने रिक्त झालेल्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे दिलेल्या रॅन्डम व विस्थापित झालेल्या शिक्षकांची विनंती बदली करण्याची मागणी आहे. भंडारा जिल्ह्यातील २६ शिक्षकांच्या जिल्ह्यात तर विभागीय आयुक्ताकडून आलेल्या पत्रानुसार तसेच रॅन्डम व विस्थापित झालेल्या शिक्षकांना संदर्भीय पत्रानुसार रिक्त झालेल्या ठिकाणी आधी समुपदेशन घेवून पदस्थापनेची कारवाई करण्याची मागणी आहे. यानंतरच उर्वरित रिक्त जागेवर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची पदस्थापना करण्यात यावी, अशी मागणीही संघातर्फे करण्यात आली आहे. या आशयाचे तसेच प्राथमिक शिक्षकांच्या प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या समस्येबाबत शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी पत संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, शिक्षक नेते श्रावण लांजेवार, संजय आजबले, सुरेश कोरे, आदेश बोंबार्डे, नरेंद्र रामटेके, संजय झंझाड, विनय धुमनखेडे, लिलाधर वासनिक, सुभाष बोरधरे, अरविंद राऊत, जे.एम. पटोले, नेपाल तुरकर आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांवर शिक्षणाधिकारी करनकोटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यात आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना त्वरीत कार्यमुक्त करून संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना पत्र निर्गमित करणे, १५ जुलै ते आॅक्टोंबर २०१४ पदवीधर शिक्षक म्हणून शिक्षकांना पदवीधर पदाची वेतन श्रेणी लागू करणे, उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे रिक्त जागा भरणे, पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करणे, निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीच्या प्रकरणांना मंजुरी प्रदान करावी, शिक्षकांचे थकबाकी देयक निकाली काढावे, वैद्यकीय प्रतीकृती प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांची प्रकरणे मंजूर करावी आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.