‘त्या’ डॉक्टरवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:11+5:302021-06-04T04:27:11+5:30

कोरोनाच्या संकटकाळात उपचाराविना कुणाचीही हेळसांड होऊ नये व प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाद्वारे खासगी रुग्णालयांकरिता ८0 ...

Take action against ‘that’ doctor | ‘त्या’ डॉक्टरवर कारवाई करा

‘त्या’ डॉक्टरवर कारवाई करा

Next

कोरोनाच्या संकटकाळात उपचाराविना कुणाचीही हेळसांड होऊ नये व प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाद्वारे खासगी रुग्णालयांकरिता ८0 व २0 टक्के दराचे धोरण राबविण्याचे निर्देश दिले होते. नियमानुसार रुग्णालयातील एकूण बेड्सच्या ८0 टक्के बेड हे शासनाने ठरवून दिलेल्या दराने तर २0 टक्के बेड हे रुग्णालय व्यवस्थापनाच्या निर्धारित दराने रुग्णांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

कोविड रुग्णांच्या वाढीव बिलासंदर्भात मागील काही दिवसांपासून शिवसेनेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. तुमसर शहरातील डॉ. गोविंद कोडवाणी यांच्या खासगी रुग्णालयाने ५0 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण २0 टक्के दरानुसारच दाखल केले. अर्थात रुग्णांची लुटमार केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला. नियमांची पायमल्ली करून जनतेची होणारी लुबाडणूक रोखण्याच्या संदर्भाने शिवसेनेने जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मंगळवारी निवेदन दिले. यावेळी निवेदन सादर करताना शिवसेनेचे अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखिल कटारे, तुषार लांजेवार उपस्थित होते.

Web Title: Take action against ‘that’ doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.