रुग्णालयातील अनुपस्थित डॉक्टरांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:41+5:302021-04-04T04:36:41+5:30
सामान्य रुग्णालय भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील अतिशय गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात, अशा अनेक रुग्णांना वॉर्डमध्ये काही कालावधीसाठी उपचारासाठी ...
सामान्य रुग्णालय भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील अतिशय गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात, अशा अनेक रुग्णांना वॉर्डमध्ये काही कालावधीसाठी उपचारासाठी राहावे लागते. नर्सेस पूर्णवेळ रुग्णसेवा देत असतात. परंतु डॉक्टर्स ड्युटी वेळेमध्ये वॉर्डात किंवा रुग्णालयाच्या परिसरामध्ये रुग्णसेवेसाठी उपचारादरम्यान नसतात. अशा अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. त्यांना उपचारासाठी ऑन कॉल वॉर्डात किंवा रुग्णालयात ड्युटीच्या पूर्णवेळ असायला पाहि. पण ते उपस्थित नसतात. अनेक डॉक्टर्स यांचे खासगी दवाखाने आहेत. तिथे रुग्ण बघायला जातात. परंतु शासकीय रुग्णालयातील रुग्णांकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील पूर्ण वेतनधारी असताना रुग्णालयाचा गुणात्मक दर्जा ढासळलेला दिसतो, असे अनेक वेळेस निदर्शनास येते. सामान्य व गरीब रुग्णांना दर्जात्मक उपचार मिळावेत, यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा भंडाराच्या कार्यकर्त्यानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांची भेट घेत चर्चा केली.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, शहराध्यक्ष सोमेंद्र शहारे, शहर महासचिव शैलेश राऊल, महासचिव पठाण, शहर उपाध्यक्ष मनीष बारापात्रे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र बनसोड, चिमणकर, कार्तिक तिरपुडे, महावीर घोडेस्वार, दिगंबर रामटेके, सर्व्हिन शेंडे उपस्थित होते
बॉक्स
अशा आहेत मागण्या
ऑन कॉल डॉक्टरांनी ड्युटीदरम्यान वॉर्डात, रुग्णालय परिसरात उपचारासाठी उपलब्ध असावे. सीसीटीव्हीमार्फत त्यांच्या रुग्णालयात येण्या-जाण्यावर वेळेवर पाळत ठेवावी. जे डॉक्टर्स वारंवार रुग्णालयाबाहेर जात असतील तर त्यांच्यावर कार्यवाही करावी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता दवाखान्यामध्ये वारंवार स्वच्छतेची मोहीम राबवावी, कोविड वॉर्डमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ बघता त्यांच्या तुलनात्मक नर्सेस डॉक्टरची कमतरता आहे, ती लवकरात लवकर भरून नवीन भरती करावी, शासकीय रुग्णालयात ड्युटीदरम्यान उपस्थित नसलेल्या डॉक्टरांवर कार्यवाही करावी.
कोट
ज्याप्रकारे दिल्लीमध्ये उच्च रुग्णसेवा, दर्जात्मक उपचार, हायक्लास पायाभूत सेवा मिळू शकतात तर आपल्या महाराष्ट्रात का बरे नाही.
सुरेश खंगार, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी