‘त्या’ पाच आरोपींवर कठोर कारवाई करा!

By admin | Published: March 16, 2017 12:27 AM2017-03-16T00:27:44+5:302017-03-16T00:27:44+5:30

लाखांदूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मूलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची तात्काळ चौकशी करुन

Take action against the five accused! | ‘त्या’ पाच आरोपींवर कठोर कारवाई करा!

‘त्या’ पाच आरोपींवर कठोर कारवाई करा!

Next

तहसीलदारांना निवेदन : १७ मार्चला सर्वपक्षीय मोर्चा
तुमसर : लाखांदूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मूलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची तात्काळ चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून १७ मार्चला महासंघातर्फे सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, लाखांदूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. यात पाच नराधमांचा समावेश असून त्यांनी अत्याचाराची चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत सोशल मिडीयावर व्हायरल केली.
इयत्ता १० व्या वर्गात शिकणारी पीडित मुलगी शाळेतून घरी परततांना ही संतापजकन प्रकार घडला. शेतावर मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी असून मागील अनेक दिवसापासून तिच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. वाटेत अडवून तोंडात बोळा घालून व डोळ्यावर पट्टी बांधून नराधमांनी गावापासून १० किमी अंतरावर दुचाकीने तिला नेण्यात आले. अत्याचार केल्यावर घरी कुणाला सांगितल्यास आई-वडील व बहिनीला जीवे मारण्याची व घर पेटविण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलीने भितीपोटी हा झालेला प्रकार लपवून ठेवला. नराधमांनी चित्रफीत व्हायरल केल्यावर खरे सत्य उघडकीस आले. पोलीस प्रशासनाने हा सर्व प्रकार केवळ बघ्याच्या भूमिकेत पाहिला. हे संतापजनक आहे.
तुमसरचे तहसीलदार डी. टी. सोनवाने यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. शिष्टमंडळात तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, जि.प. सदस्य संदीप ताले, गटनेता हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य मुन्ना पुंडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर सह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

माळी महासंघ तथा सर्वपक्षीय मोर्च्याचे आयोजन १७ मार्च रोजी करण्यात आले आहे. पाचही नराधमांना कठोर शिक्षा व कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल.
- कविता बनकर,
सभापती पं.स. तुमसर

Web Title: Take action against the five accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.