रेतीचा अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:10 AM2019-07-10T01:10:08+5:302019-07-10T01:11:05+5:30

चुलबंद नदीकाठावरील वाकलटोला परिसरातील रेतीसाठा जप्त करण्याची मागणी आहे. कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांसह जनशक्ती अन्याय समस्या निवारण संघटनेचे पदाधिकारी उपोषण करतील, असा इशाराही अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

Take action against illegal sandstormers | रेतीचा अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करा

रेतीचा अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करा

googlenewsNext
ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचे दुर्लक्ष : चुलबंद नदीच्या काठावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव (सडक) : चुलबंद नदीकाठावरील वाकलटोला परिसरातील रेतीसाठा जप्त करण्याची मागणी आहे. कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांसह जनशक्ती अन्याय समस्या निवारण संघटनेचे पदाधिकारी उपोषण करतील, असा इशाराही अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
लाखनी तालुक्यातील वाकलटोला वाळू घाटावरील तिरावर अंदाजे १० ते १२ हजार ब्रास वाळुचा साठा करून ठेवला आहे. मात्र तहसीलदार लाखनी व खनिकर्म अधिकारी भंडारा यांच्याशी चर्चेअंती सदर साठा करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र या साठ्यावर कारवाई करण्याची वारंवार सुचना देवून सुद्धा कारवाई न करण्यात आल्याने अन्याय समस्या निवारण संघटनेनी निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
सदर अवैध वाळू साठा जप्त करण्याचे आदेश देवून वाळू घाटांची परवानगी रद्द करण्यात यावी अन्यथा १२ जुलैपासून गावकऱ्यांसह संघटनेचे पदाधिकारी उपोषणास बसतील, अशा प्रकारचा इशारा संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. याप्रसंगी कोणती अनुचित घटना घडल्यास शासन जबाबदार राहील, असे दिलेल्या निवेदनात नमुद आहे उल्लेखनीय बाब म्हणजे तालुक्यात होणाºया अवैध मुरूम उत्खनन व रेतीचे अवैध वाहतूकचा साठ्यावर महसूल तसेच पोलीस विभागाकडून कारवाई होत नाही.
६ जुलै रोजी सायंकाळी रेतीचा अवैधपणे साठा ठेवणाºया टिप्परने विद्युत विभागाचे ट्रान्सफार्मर पोल व तारांची नासधुस करून विद्युत विभागाचे नुकसान केले. यावर कारवाइर होणे गरजेचे आहे.

Web Title: Take action against illegal sandstormers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू