‘त्या’ अधिकाºयांविरूद्ध कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 10:23 PM2017-10-05T22:23:39+5:302017-10-05T22:23:52+5:30
कोका येथील राजेंद्र साठवणे या तरूणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आंदोलकांविरूद्ध हेतुपुरस्पर गुन्हे नोंदविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोका येथील राजेंद्र साठवणे या तरूणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आंदोलकांविरूद्ध हेतुपुरस्पर गुन्हे नोंदविण्यात आले. या आंदोलकांवरील गुन्हे रद्द करून संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी व पोलीस अधिकारी यांच्याविरूद्व कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.
कोका येथील रहिवाशी राजेंद्र साठवणे यांचे टेलरींगचे खडकी येथे दुकान आहे. तो नेहमीप्रमाणे खडकीकडे जाताना बोंडे शिवारात रानडुकराच्या कळपाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच करडीचे ठाणेदार कायते, हवालदार नंदेश्वर घटनास्थळी दाखल झाले परंतु वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आले नाही. त्यामुळे जमावाने प्रशासनाप्रती रोष निर्माण झाला. त्यानंतर आमदार चरण वाघमारे, कोकाचे जि.प.सदस्य उत्तम इळपाते, मुंढरीच्या जि.प.सदस्या सारिका चौरागडे, के.बी.चौरागडे, उपसभापती विकास गोन्नाडे, नितेश सेलोकर, सरपंच भुपेंद्र पवनकर, रवि तिडके, अजय नारनवरे, वाल्मिक गोबाडे, बाबुराव ठवकर, भगवान चांदेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन संताप व्यक्त केला. वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडगे यांनी कारधा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत जि.प.सदस्य उत्तम इळपाते, सरपंच नटवीर टेकाम, तंमुस अध्यक्ष तुकाराम हातझाडे, हितेश सेलोकर यांनी अन्य काही लोकांच्या मदतीने कोका वन्यजीव अभयारण्या अंतर्गत येणाºया दुधारा शिवारातील तपासणी नाका जाळुन शासकीय सामानाचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी रात्री दीड वाजता गावात जावून त्यांना ताब्यात घेतले. घटनेच्यावेळी शेंडगे हे तिथे उपस्थित नव्हते. पोलिसांनी मोठे गुन्हेगार असल्यासारखे मध्यरात्री ताब्यात कसे घेतले. असा प्रश्न भोंडेकर यांनी केला. . पत्रपरिषदेला उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अनिल गायधने, अॅड.रवि वाढई उपस्थित होते.