सहायक प्रबंधकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:28 AM2017-12-09T00:28:45+5:302017-12-09T00:29:20+5:30
आयुध निर्माणीचे सहायक कामगार प्रबंधक शैकी बग्गा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढले.
आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : आयुध निर्माणीचे सहायक कामगार प्रबंधक शैकी बग्गा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयुध निर्माणी कारखान्यात आयोजित श्रद्धांजली सभेला गेलेल्या कर्मचाºयांना महापुरूषाबाबद अशब्द वापरल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या आशयाची तक्रार जे.ए. बॅनर्जी व सहकारी यांनी जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल केली.
६ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आयुध निर्माणी कारखान्यात आयुध निर्माणी बुद्धविहार समिती जवाहरनगर कोंढीने कार्यक्रम घेतला होता. सदर कार्यक्रमाला आयुध निर्माणीतील अधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते. त्यानुसार जे.ए. बॅनजी व नरेंद्र वंजारी हे सकाळपाळतील आपले कर्तव्य पार पाडून चाहा नास्ता वेळेत कार्यक्रमात हजर राहण्यासाठी गेले. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतले. यावेळी डी.व्ही.ओ. सहायक कामगार प्रबंधक शैंकी बग्गा यांनी दोघांनाही, डॉ. बाबासाहेबांबद्दल अपशब्दात बोलून भावना दुखावल्या. आयुध निर्माणी बुद्ध विहार समिती व परिसरातील महिला संघटनेने कारवाईची मागणी केली आहे.
‘त्या’ अधिकाऱ्याला ताब्यात घेतले
डॉ. बाबासाहेबाबाबद अपमानजनक शब्द वापरल्या प्रकरणी ७ डिसेंबर रोजी आयुध निर्माणी परिसरात तणावाचे वातावरण होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी चौकशीकरिता शैंकी बग्गा यांना ताब्यात घेतले असून त्यांना भंडारा न्यायालयात हजर करण्यात रवाना केले.
मला हेतुपुरस्सर या प्रकरणात गोवले गेले. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबद आदर आहे. तक्रारकर्त्यांनी दिलेली तक्रार खोटी आहे. मी तसे काहीच बोललो नाही. मी माझ्या कर्मचाºयाला कामाविषयीच बोललो. मी स्वत: चौकशीला सामोरे जाण्यास इच्छूक आहे. सत्य उजेडात येईल. या प्रकरणाला वेगळे वळण देणाचा प्रयत्न करीत आहे.
-शैंकी बग्गा, सह. प्रबंधक, आयुध निर्माण भंडारा.