‘पीओपी’ मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:10 AM2019-08-29T00:10:16+5:302019-08-29T00:10:50+5:30
ग्रामीण भागात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विकणाºयावर दंडात्मक कारवाई करुन कायमस्वरुपी बंदी घालण्याचा ठराव भंडारा नगरपरिषदेने यापूर्वीच ३१ डिसेंबर २०१८ ला घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभर जिल्हा प्रशासनाने बंदीचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : जिल्हा प्रशासनाने कुंभार महासंघाच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जिल्हा प्रशासनाने शहरासह व ग्रामीण भागात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विकणाºयावर दंडात्मक कारवाई करुन कायमस्वरुपी बंदी घालण्याचा ठराव भंडारा नगरपरिषदेने यापूर्वीच ३१ डिसेंबर २०१८ ला घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभर जिल्हा प्रशासनाने बंदीचे निर्देश दिले. त्याचा सकारात्मक परिणामाने पवनी तालुक्यात पीओपी मूर्तींवरील बंदीने बºयाच मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्ती तयार केल्या नाहीत.
मात्र पवनी तालुक्यात काही ठिकाणी आजही अड्याळ, कोंढा, पवनी, आसगाव, बाचेवाडी आदी गावात जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून पीओपीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. परंतु जे मूर्तीकार शासनाच्या आदेशाचे पालन करत आहेत त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पीओपी मूर्तीकारांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदार पवनी यांचे मार्फत निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी कुंभार समाज व मातीमूतीकारांनी केली आहे.
निवेदनात पवनी तालुक्यात कुंभार समाज व मातीचे मूर्तीकामगार प्रत्येक खेड्यापाड्यात वास्तव्यास आहेत. मातीच्या मूर्ती तयार करून कुटुंबाचा उदरर्निाह करतात. मात्र तालुक्यातील व जिल्ह्यातील गर्भश्रीमंत मूर्तीकारांची पर जिल्ह्यातून पीओपीच्या कच्चा माल आणून पैसे कमावू धंदा अवलंबिल्याने माती मूर्तीकारांवर उपासमारीची पाळी आली आहे.
गत काही वर्षापासून भंडारा जिल्ह्यात पीओपीच्या मूर्ती विकल्या जात आहेत. अत्ळंत आकर्षक रंगात आणि कमी किमतीत विकत असल्यामुळे देवदेवतांच्या मूर्ती भाविक खरेदी करतात. मात्र त्या मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात अथवा गाव तलावामध्ये केले जातात. पण त्या मूर्ती पूर्णत: विसर्जीत होत नाही. नदीपात्रातील व तलावातील पाणी कमी झाल्यानंतर पीओपीच्या मूर्ती जसेच्या तशेच दिसतात. त्यामुळे मूर्तींची विटंबना व पर्यावरण प्रश्न निर्माण होतो. परंतु परंपरागत मातीच्या मूर्ती बनविणाºया कुंभार समाजावर व माती मूर्तीकलाकारावर उपासमारीची पाळी आली असल्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पवनी तालुक्यात पवनी, अड्याळ, कोंढा, बाचेवाडी आदी गावात पीओपी मूर्तिकारांनी दुकानदाºया थाटल्या आहेत. जिल्हाधिकारी व भंडारा नगरपरिषदेने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी व दंडाची कारवाई करण्याचे निर्देश आठ महिन्याअगोदर देण्यात आले.
मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्ती तयार केल्या नाही. मात्र तालुक्यातील कोंढा, पवनी, अड्याळ, बाचेवाडी आदी गावातील मूर्तीकारांनी त्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता पीओपीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. मात्र ज्यांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले त्यांचेवर अन्याय झाला असून उपासमारीची पाळी आली आहे.
पवनी तालुक्यातील पीओपी मूर्र्तिकारांना भेट दिली असता त्यांना शाडू मातीचे मूर्ती असल्याचे सांगून पीओपी विक्रीचा गोरखधंदा केला जात आहे. करिता जिल्हा प्रशासनाने तात्काळ त्या विक्रेत्यांची चौकशी करून दंड व बंदीची कारवाई करण्याची मागणी दुर्गेश हटवार, रवींद्र लेदे, मधू जांभुळकर, प्रकाश हातेल, महादेव मोहरकर, पांडूरंग मोहरकर, गणेश वाघमारे, पांडूरंग मेश्राम, राकेश वरवाडे, विमल वरवाडे, अशोक वरवाडे, सूर्यभान वरवाडे, वसंत वरवाडे, वंदना खांदाडे, प्रतिमा वरवाडे, प्रदीप वरवाडे, माधव मेश्राम, गोविंदा आठवले यांनी निवेदनातून केली आहे.