समाधान योजनेचा लाभ घ्या

By admin | Published: October 22, 2016 12:25 AM2016-10-22T00:25:34+5:302016-10-22T00:25:34+5:30

महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत.

Take advantage of the solution plan | समाधान योजनेचा लाभ घ्या

समाधान योजनेचा लाभ घ्या

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : पर्यटन क्षेत्र रावणवाडी स्वच्छ ठेवा
भंडारा : महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त गावकऱ्यांनी घ्यावा. त्यासोबतच रावणवाडी हे जिल्हयातील पर्यटन क्षेत्र असून पर्यटकांची नेहमी वर्दळ असते, त्यामुळे येथील परिसरात कचरा होत असतो. आपले गाव नेहमी स्वच्छ ठेवण्याकरीता नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
रावणवाडी येथे महसूल विभागाच्यावतीने समाधान योजना शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार संजय पवार, सरपंच जगदिश उके उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, रावणवाडी हे गाव सन २०१६-१७ च्या जलयुक्त शिवार योजनेत घेण्यात आले आहे. त्यामुळे शेती व पिण्याकरीता पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ही योजना लोकसभागातून राबवावी. हागणदारी मुक्त योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत शौचालयाचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शाळेमध्ये लोकवर्गणी करुन डिजीटल शाळा, आंगणवाडी तयार करण्यासाठी समोर येण्याची गरज आहे. या शिबीरात महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, समाज कल्याण, पुरवठा विभाग, भूमी अभिलेख, एकात्मिक बालविकास विभाग, एकात्मिक आदिवासी विभाग, पशुसंवर्धन विभाग, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त महामंडळ, कृषि विभागाने स्टॉल लावले होते. जनकल्याणाच्या योजनाचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या शिबीरात आधार वाटप, अधिवास प्रमाणपत्र-१८, नॉनक्रिमिलेअर- १०, रेशन कार्ड वाटप-२६, जमिनीचे सामुदायिक पट्टे वाटप-३, शौचालयाचे धनादेश, जात प्रमाणपत्र-१०८, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु झालेल्या कुटूंबांना ४ लाखाचे धनादेश,मिनी टॅक्टर वाटप संमतीपत्र-२, राष्ट्रीय कुटूंब योजना लाभ मंजुरी आदेश-३ ग्रामपंचायत रावणवाडीतर्फे २८ दाखल्याचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातर्फे १९२ लोकांची रक्तदाब व शुगर तपासणी करण्यात आली.
प्रारंभी चिखली येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. प्रास्ताविकात तहसिलदार संजय पवार यांनी समाधान शिबीराची माहिती दिली. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठीच महाराजस्व   अभियान राबविण्यात येत आहे, या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आभारप्रदर्शन तहसिलदार संजय पवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Take advantage of the solution plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.