आंबेडकरी तत्त्वज्ञान आचरणात आणा

By admin | Published: April 15, 2017 12:30 AM2017-04-15T00:30:51+5:302017-04-15T00:30:51+5:30

भगवान गौतम बुध्दांचे आणि बाबासाहेबांचे पुतळे उभे केल्याने समाज परिवर्तन होत नसून बुध्द, आंबेडकरी तत्वज्ञान अंगीकारून आचरणात आणावे लागेल.

Take Ambedkar philosophies in mind | आंबेडकरी तत्त्वज्ञान आचरणात आणा

आंबेडकरी तत्त्वज्ञान आचरणात आणा

Next

जोगेंद्र कवाडे : आमगाव येथे बुद्धविहाराचे लोकार्पण
साकोली : भगवान गौतम बुध्दांचे आणि बाबासाहेबांचे पुतळे उभे केल्याने समाज परिवर्तन होत नसून बुध्द, आंबेडकरी तत्वज्ञान अंगीकारून आचरणात आणावे लागेल. त्याशिवाय खऱ्या अर्थाने क्रांती होणार नाही. कधी नव्हे ती आता समाजाने एकत्रित होण्याची गरज असल्याचे आवाहन लाँग मार्चचे प्रणते प्रा.जोगेन्द्र कवाडे यांनी केले.
सिध्दार्थ बौध्द विहार आमगाव (खुर्द) च्यावतीने तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळ््याचे अनावरण तथा बुध्द विहाराचे उद्घाटन लाँग मार्चचे प्रणते प्रा.जोगेन्द्र कवाडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पँथर हल्लाबोल ब्रिगेडचे अध्यक्ष परमानंद मेश्राम हे होते. योवळी धम्मशील गणवीर, एफ.एस. छतिसगडे, प्रा. अशोक घरडे, राकेश भलावी, पुरण लोणारे, अनमोल गजभिये, मदनपाल गोस्वामी, मंदा गणवीर, जिल्हा परिषद सदस्य, उषा डोंगरवार, पंचायत समिती सदस्य जगदिश नागदेवे, विलास मेश्राम, शिवा बघेल हे उपस्थित होते.
यावेळी परमानंद मेश्राम म्हणाले, सरकार एकीकडे पुतळे, स्मारकांसाठी पुढाकार घेत आहे तर दुसरीकडे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान हस्तगत करण्याचे षडयंत्र करीत असून नाहीरे वर्गाच्या हक्कापासून त्यांना दूर करीत आहे. आपल्या अधिकारासाठी, क्रांतीची भाषा बोलतील त्यांना धार्मिक प्रकरणात अडकवा ते सर्व मुख्य मुद्यापासून भटकतील. व न्याय हक्काची लढाई विसरतील, असे आताची स्थिती बघून वाटत असल्याचे परमानंद मेश्राम म्हणाले, कार्यक्रमाला गावातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मनोधैर्य पथक गठित
भंडारा : मनोधैर्य योजनेचा लाभ मिळण्याकरिता अत्याचार बालकावरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसीड हल्ला प्रकरणातील पीडित व्यक्तीनी पोलिसांना तक्रारीनंतर मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार यामध्ये पीडित महिला व बालकांना आधारासाठी व त्यांना मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी सहाय्य करण्याच्या हेतूने तालुकास्तरावर प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोधैर्य टीम गठीत करण्यात आली. सदर मनोधैर्य टीममध्ये ग्रामीण क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी संबंधित तालुका समन्वयक, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, नर्स व तालुका समादेशक आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Take Ambedkar philosophies in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.