म्युकरमायकोसिसची वेळीच काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:13+5:302021-05-28T04:26:13+5:30
बॉक्स अशी आहेत लक्षणे या आजारात चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, डोक्याची एक बाजू दुखणे, नाक बुजणे, ...
बॉक्स
अशी आहेत लक्षणे
या आजारात चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, डोक्याची एक बाजू दुखणे, नाक बुजणे, नाकावर सूज येणे, एका नाकपुडीतून रक्तस्राव, काळपट स्राव, चेहरा अथवा डोळ्यावर सूज, एक पापणी अर्धी बंद राहणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे अशी लक्षणे आहेत.
बॉक्स
प्रतिबंधात्मक उपाय
यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे, नाक, कान, घसा, नेत्र व दंतरोग तज्ज्ञाकडून एक आठवड्यानंतर तपासणी करणे, लक्षणे आढळल्यास डॉक्टराशी संपर्क साधणे, डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टेरॉईड न घेणे, टुथब्रश, मास्क वरच्यावर बदलणे, दिवसातून एकदा गुळण्या करणे, वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता ठेवणे, भाज्या नीट व स्वच्छ धुवून खाव्या, मातीत काम करताना व खताचा वापर करताना पूर्णबाहीचा शर्ट, फुलपँट, हातात ग्लोव्हज घालावे व नाकातोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे.
तसेच छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, घरगुती उपायाचा पर्याय निवडू नये, वैयक्तिक सल्ल्याने स्टेरॉईड व इतर औषधांचे सेवन करू नये.