संगणक परिचालकांना शासन सेवेत घ्या
By admin | Published: September 20, 2015 01:01 AM2015-09-20T01:01:22+5:302015-09-20T01:01:22+5:30
शासनानी ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्ड, नोंदी, दाखले आॅनलाईन केले असल्याने भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात महाआॅनलाईन कडून संगणक परिचालकांची नेमणूक केली.
जांब (लोहारा) : शासनानी ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्ड, नोंदी, दाखले आॅनलाईन केले असल्याने भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात महाआॅनलाईन कडून संगणक परिचालकांची नेमणूक केली.
महाआॅनलाईनने नेमणूक केलेले संगणक परिचालक म्हणून कार्यत आहेत. त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कामे नियुक्तीपासून आजपर्यंत व्यवस्थीत पार पाडत आहेत. संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना सदर घेतलेला ठराव पाठविले आहे. महाआॅनलाईन नेमणूक केलेले संगणक परिचालकांच्या मानधन, वेतन करिता ग्रामपंचायतच्या १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून जिल्हा परिषद कडून महाआॅनलाईन निधी पुरविली जाते. सध्या सप्टेंबर महिन् यापासून तेराव्या वित्त आयोग बंद होत आहे. ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायतचे पैसे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर कंपनीला पाठविला जातो. पण ग्रामपंचायतकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एका संगणक परिचालकाकरिता जवळ जवळ एका महिन्याला दहा हजार रुपये पाठविला जातो. त्यानुसार संगणक परिचालकांचे ग्रामपंचायत मधील महत्व व आवश्यक लक्षात घेता संगणक परिचालकास जिल्हा परिषद कडून करावे अशा ठराव जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतीने बहुमताने घेऊन पास केला व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविले आहे. तरी राज्य शासनांनी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांना शासन सेवेत समाविष्ट करण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने केली आहे. पण प्रत्यक्ष संगणक परिचालकाला जिल्हा परिषदेकडून पाठविलेले पैसे पुरेपुर मिळत नसल्याचे लक्षात परिचालकांना शासकीय सेवेत का समाविष्ट करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)