ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:15 PM2018-03-04T23:15:30+5:302018-03-04T23:15:30+5:30
समाजाची प्रगती करण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रतिनिधीत्व असायला हवा. आर्थिक अडचणीमुळे अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहतात. समाजातील सधनांनी त्यांना मोठे करण्यासाठी मदत केली पाहिजे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : समाजाची प्रगती करण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रतिनिधीत्व असायला हवा. आर्थिक अडचणीमुळे अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहतात. समाजातील सधनांनी त्यांना मोठे करण्यासाठी मदत केली पाहिजे. जुन्या पध्दतीला फाटा दिला जावा. गाव खेड्यातील गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात दिला तरच समाजाची उन्नती होईल, असे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले.
भंडारा जिल्हा बावणे कुणबी समाजसेवा मंडळाच्यावतीने बावणे कुणबी समाजातील जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त कर्मचारी, नवनियुक्त सरपंच, सभापती, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, रक्तदाते यांचा सत्कार सोहळा संत तुकाराम महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी नागपूर बावणे कुणबी समाजाचे अध्यक्ष के.टी. मते होते. उद्घाटक म्हणून डेप्युटीचिफ अकांउटंट जनरल दिनेश माटे यांनी केले. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, मधुकर कुकडे, रामलाल चौधरी, देवराम मते, भगीरथ थोटे, मुरलीधर भर्रे, संजय आजबले, शालिक कुकडे, अॅड. सिताराम हलमारे, नारायण तितिरमारे, जयकृष्ण फेंडरकर, समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सदानंद इलमे उपस्थित होते.
प्रास्ताविक सदानंद ईलमे यांनी केले. जेष्ठ नागरिक वत्सला सेलोकर, रामचंद्र धुमनखेडे, श्रीपत चौधरी, नारायण तितीरमारे, श्रीपंत बांते, आत्माराम सेलोकर, पारबता बोंदरे, खुशाल कहालकर, वसंत मते, राजाराम हलमारे, महादेव खोकले, सेवानिवृत्त कर्मचारी वामन चवळे आदींचा सत्कार करण्यात आला.