विनापरवाना वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:47 AM2018-07-06T00:47:48+5:302018-07-06T00:48:39+5:30

परवानाप्राप्त वाहनातूनच शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण केली पाहिजे, असा शासन नियम आहे. परंतु अलिकडे अनेक ठिकाणी खाजगी वाहतूकदार परवानाविना विद्यार्थ्यांना शाळेत नेत आहेत. अशा आठ वाहन चालकांविरूद्ध भंडारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने लाखनी परिसरात गुरूवारला दुपारी कारवाई केली.

Take school students from unpaid vehicles | विनापरवाना वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण

विनापरवाना वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीओची दंडात्मक कारवाई : लाखनी तालुक्यात आठ वाहने केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परवानाप्राप्त वाहनातूनच शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण केली पाहिजे, असा शासन नियम आहे. परंतु अलिकडे अनेक ठिकाणी खाजगी वाहतूकदार परवानाविना विद्यार्थ्यांना शाळेत नेत आहेत. अशा आठ वाहन चालकांविरूद्ध भंडारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने लाखनी परिसरात गुरूवारला दुपारी कारवाई केली.
भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी व लाखांदूर तालुक्यात विविध खाजगी शाळा आणि कॉन्व्हेंट आहेत. कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थी आणण्यासाठी चढाओढ असतानाच आता परवाना नसताना अशा वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यात सातही तालुक्यात २०७ परवानाप्राप्त स्कूल बसेस आहेत.
त्याशिवाय प्रत्येक तालुक्यात पाच ते सहा असे ३५ ते ४० वाहन चालकांनी परवाना घेतलेला नाही. तरीसुद्धा ते राजरोसपणे वाहन चालवित आहेत.
ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक प्रमोद सरोदे आणि मोहन बुरडे यांनी गुरूवारला दुपारी केली.
दोन वाहनचालकांनी भरला दंड
दरम्यान, लाखनी येथे मोटर वाहन निरीक्षक प्रमोद सरोदे, मोहन बुरडे केलेल्या कारवाईत आठ वाहने ताब्यात घेण्यात आले. त्या वाहन चालकांजवळ विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे ही वाहने लाखनी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. त्यानंतर दोन चालक वाहन परत नेण्यासाठी आले होते. त्यांच्याकडील कागदपत्रांची पाहणी करून एका वाहनचालकावर ८,५०० रूपयांचा तर दुसऱ्याला ४,५०० दंड ठोठावला. या चालकांनी दंडाची रक्कम भरल्यानंतर वाहन सोडण्यात आले. यावेळी त्याला परवाना काढण्याचे निर्देशही देण्यात आले.
मोहीम सुरूच राहणार
उपप्रादेशिक परिवहन विभागाची ही नियमित कारवाई असून अवैधरित्या वाहतुकीविरूद्ध ही मोहीम वर्षभरच राबविण्यात येते. शालेय सत्र सुरू झाल्यामुळे आता या स्कूल बसेसवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. २०७ परवानाधारक वाहन चालक असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आजही विनापरवानाधारक वाहने सुरू आहेत. ही मोहीम जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आणि प्रत्येक शाळेत जावून परवान्याची तपासणी करण्यात येणार आहे. यात कमी वाहनांचा परवाना घेऊन जास्त वाहने सुरू आहेत का हेसुद्धा तपासण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवतात
शाळा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसेसची सुविधा केली असली तरी या बसेसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नेत असल्याचे दिसून आले आहे. एका बसमध्ये किती विद्यार्थ्यांना बसविता येऊ शकते, याची मार्गदर्शिका शासनाने तयार करून दिली आहे. असे असतानाही क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नेण्यात येत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने सकाळच्या सत्रात ही मोहीम राबविल्यास त्यांना एका बसमध्ये किती विद्यार्थ्यांची संख्या आहे, याची उलगडा होऊ शकते.

Web Title: Take school students from unpaid vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.