शेतशिवार ‘हरितक्रांती’साठी गाळाचा आधार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 12:21 AM2017-05-29T00:21:29+5:302017-05-29T00:21:29+5:30

लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा.

Take the support of sediment for farming 'Green Revolution' | शेतशिवार ‘हरितक्रांती’साठी गाळाचा आधार घ्या

शेतशिवार ‘हरितक्रांती’साठी गाळाचा आधार घ्या

Next

तहसीलदार राजीव शक्करवार : गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लोकसहभागाशिवाय विकास व योजना पूर्णत्वाला जाणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या योजनेत सहभाग नोंदवित विकास मोहिमेला सहकार्य करा. गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार योजनेला लोकसहभागाचा आधार देऊन तलाव व शिवार वाचवा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केले.
पालांदुर येथे मामा तलावाच्या गाळमुक्त तलाव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालांदूरच्या सरपंच शुभांगी मदनकर, कवलेवाडा सरपंच वैशाली खंडाईत, न्याहरवानीचे रत्नाकर नागलवाडे, दामाजी खंडाईत, ग्रामविस्तार अधिकारी एच.एम. बावनकर, नायब तहसीलदार विनोद थोरवे, नायब तहसीलदार शरद घारगडे, मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, तलाठी नरेश पडोळे, तंमुस अध्यक्ष हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे, कोतवाल खंडाईत, पर्यावरणप्रेमी इद्रीस लद्धानी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शक्करवार यांनी, तलावातील गाळ उपश्याने पाणीसाठा वाढून भूगर्भात पाणी जिरायला मोठी मदत होणार आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतशिवार सुपिक व्हायला वेळ लागणार नाही. एकाच योजनेतून दोन कामे शेतकऱ्यांकरिता यशस्वीरित्यापुढे येत आहेत. लाखनी तालुक्यात पहिल्या टप्प्यात सात गावांचा यात सहभाग करण्यात आला असून त्यात दैतमांगली, गडेगाव, सामेवाडा, पालांदूर, रेंगेपार (कोहळी), निलागोंदी, मानेगाव यांचा समावेश आहे.
ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढलेला गाळ शेतशिवारात पोहचत आहे. कालपर्यंत सुमारे २,१९३ क्युमीकमिटर गाळ उपसून २५ हेक्टरमध्ये पोहचविण्यात आला. याकरिता शेतकरी हा आमचा गाभा असून त्याच्या उत्थानाकरिता शासनाचा व प्रशासनाचा प्रभावी माध्यम ठरत आहे. पालांदुरात आठवडाभर हा कार्यक्रम सुरु राहून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता प्रयत्न केला जाईल. याकरिता पालांदूरचे मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा योजनेचा लाभ घेत दुपारी ४ वाजेपर्यंत ७० ट्रॅक्टर गाळाची उचल केली आहे, हे विशेष.
योजना योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. लोकसहभागातूनच कोणत्याही योजनेचे फलीत शक्य आहे. पुढील टप्प्यात ही योजना रोहयो अंतर्गत राबविली तर मजुरांना काम मिळून त्यांच्या आर्थिक उत्थानाला मदत होईल असे प्रतिपादन सरपंच शुभांगी मदनकर यांनी केले.
दामाजी खंडाईत यांनी, ही योजना जुनीच आहे. सरकारने फक्त तीचे रूप बदलवीले आहे. ग्रामपंचायतच्या अधिकारात कलम ५१ नुसार पूर्वी सुरू होते. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. लहान मोठ्या शेतकऱ्यांना गाळ मिळून योजनेची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला पालांदूर ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Take the support of sediment for farming 'Green Revolution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.