शिक्षकांचे प्रशिक्षण सकाळपाळीत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:22 PM2018-04-15T23:22:59+5:302018-04-15T23:22:59+5:30
शिक्षकांना प्रशिक्षण स्थळी योग्य सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात व प्रशिक्षण सकाळी आयोजित करण्यात यावे याकरिता भाजप शिक्षक आघाडीतर्फे विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात मा शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शिक्षकांना प्रशिक्षण स्थळी योग्य सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात व प्रशिक्षण सकाळी आयोजित करण्यात यावे याकरिता भाजप शिक्षक आघाडीतर्फे विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात मा शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले
९ एप्रिल पासून सुरू होणा?्या इयत्ता दहावीच्या पुनरर्चित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण नागपुर विभागात सुरू होत आहेत . नागपूर विभागात एप्रिल महिन्यात प्रचंड तापमान असते त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण स्थळी येण्या जाण्याचा उन्हात त्रास होवू नये हा उद्देश ठेवून आपण प्रशिक्षण सकाळी घेण्यात यावे अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली तसेच प्रशिक्षण केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असायला पाहिजे ,प्रशिक्षण केंद्रावर शिक्षकांना होणारा त्रास बिल्कुल खपवून घेणार नाही असे अनिल शिवणकर यांनी सांगितले व इतर कुठल्याही प्रकारची प्रशिक्षण ही दुपारी घेऊ नये, ती प्रशिक्षण सकाळ पाळीत घ्यावी अश्या प्रकारची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने निवेदनामार्फत केलेली आहे .
त्यावर शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षकांना कोणताही त्रास प्रशिक्षण केंद्रवार होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे असे आश्वासन दिले
नागपूर विभागातील उन्हाळ्याचा विचार करता उन्हाच्या दृष्टीने बरीच भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक राहील आणि शिक्षकांची संख्या लक्षात घेता या सुविधा प्रशिक्षण स्थळी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहेत.
याकरिता अशे प्रशिक्षण सकाळ पाळीतच घेण्यात यावे अन्यथा शिक्षकांच्या होणाऱ्या गैरसोईबाबद शिक्षण विभाग जबाबदार राहतील असे डॉ उल्हास फडकेयांनी बजावून सांगितले. निवेदन देते वेळी भाजप शिक्षक आघाडी चे विदर्भ संयोजक डॉ उल्हास फडके ,सहसंयोजक अनिल शिवणकर नागपूर ग्रामीण चे संयोजक मेघश्याम झंजाळ ,प्रदीप बिबटे ,सहसंयोजक पुष्पराज मेश्राम, संदीपकुमार उरकुडे, दिलीप घिरडे , सुहास महाजन , ओमकार श्रीखंडे , अजय भिडेकर , कवडू गुलाबे , मनीष वाजपेयी , चंद्रकांत तागडे , हरिभाऊ शेंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते