रेतीघाटावर तलाठ्याच्या ड्युट्या लावणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:34 AM2021-03-25T04:34:20+5:302021-03-25T04:34:20+5:30
साकोली : तालुक्यात सध्या लिलाव झालेल्या व लिलाव न झालेल्या सर्वच रेतीघाटातून अवैधरित्या रेती उत्खनन सुरु आहे. हा सर्व ...
साकोली : तालुक्यात सध्या लिलाव झालेल्या व लिलाव न झालेल्या सर्वच रेतीघाटातून अवैधरित्या रेती उत्खनन सुरु आहे. हा सर्व गैरप्रकार थांबविण्यासाठी लिललाव झालेल्या रेतीघाटावर दररोज तलाठ्यांची ड्युटी लावणे आवश्यक झाले आहे. तर रेतीघाटावरील गैरप्रकार थांबविता येईल.
सध्या साकोली तालुक्यात रेतीमाफिया राज सुरु असून अधिकारी आर्थिक देवाणघेवाणीच्या ओझ्याखाली जगत आहेत. यात अधिकारी व रेतीतस्कर मालामाल होत असले तरी शासनाची तिजोरी मात्र खाली होत आहे. या अवैध व्यवसायामुळे शासनाला दररोज कोट्यवधीचे नुकसान होत आहे. ज्या रेती घाटाचा लिलाव झालेला आहे त्या रेतीघाटातून फक्त पहिल्या रेतीच्या ट्रीपची राॅयल्टी काढली जाते व उर्वरीत दिवसभर रेतीच्या राॅयल्टीच काढल्या जात नाही. नियमाप्रमाणे कोणत्याही रेतीघाटाटवाल्यांना विना राॅयल्टी रेतीची विक्रीच करता येत नाही. तरीही या नियमाला बगल देत साकोली तालुक्यात हा गैरप्रकार राजरोसपणे सुरु आहे. या सर्व प्रकाराला महसुल विभागाची हातमिळवणी असल्याची चर्चा आहे. प्रत्येक ट्रीपखाली हा पहिली राॅयल्टी ही नागपूर किंवा रामटेकची काढतो. त्यामुळे त्याला राॅयल्टीची वेळ जवळपास १० ते १२ तासाची मिळते. मात्र ही रेती साकोली किंवा जवळपासच्या गावात टाकली जाते व याच उर्वरीत वाचलेल्या वेळेचा उपयोग इतर ट्रीपसाठी करण्यात येतो. त्यामुळे महसुल विभागातर्फे लिलाव झालेल्या रेतीघाटावर तलाठ्यांची आळीपाळीने ड्युटी लावण्यात यावी जेणेकरुन रेतीघाटातून टिप्पर निघाल्यास त्या राॅयल्टीवर तलाठ्याची सही व वेळ असेल. यामुळे अवैध उत्खननावर नक्कीच आळा बसेल.
चौकशी करु
तहसीलदार रमेश कुंभारे
लिलाव झालेल्या रेतीघाटातील राॅयल्टी प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करुन लवकरच तलाठ्याची ड्युटी रेतीघाटावर लावू.