तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन

By admin | Published: April 12, 2016 12:37 AM2016-04-12T00:37:46+5:302016-04-12T00:37:46+5:30

महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, विदर्भ पटवारी संघ नागपूर, विदर्भ राजस्व मंडळ अधिकारी संघ नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ ...

Talathi, circle officer's movement | तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन

Next

प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा : अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा संघटनांचा इशारा
साकोली : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, विदर्भ पटवारी संघ नागपूर, विदर्भ राजस्व मंडळ अधिकारी संघ नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ या शासनमान्यता प्राप्त संघटना महाराष्ट्रातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या शासनाकडे मांडत आहे. या मागण्यांची पूर्तता २०१५ पर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री यांनी दिले होते. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे सोमवारी साकोली येथे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
तलाठी साझ्याची व महसूल मंडळाची पुनर्रचना व मंडळ कार्यालयाचे भाडे देणे, सात बारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी, सॉफ्टवेअर दुरुस्ती, सर्वरची स्पीड, कनेक्टीव्हीटी इत्यादी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, तलाठी कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना या मागण्या शासनाने तत्काळ मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलन पुन्हा पुन्हा टप्प्याटप्पाने करण्याचा निर्णय संघटनेतर्फे केला आहे. या आंदोलनात विदर्भ पटवारी संघ उपविभागीय शाखा साकोलीचे उपाध्यक्ष दिनेश सिडाम, मंडळ अधिकारी श्रीधर कारेमोरे, मंडळ अधिकारी संजय बंसोड, तलाठी शेखर ठाकरे, लालचंद बावनकर, गीता मेश्राम, सुनिता साखरवाडे, मंदा कारेमोरे, यु.एन. भोयर, नरेंद्र चवळे, होमेश्वर मदनकर, व्ही.टी. हटवार, एच.जी. खोब्रागडे, एस.पी. बिसेन, बी.एस. शिंदे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Talathi, circle officer's movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.