तलाठी कार्यालयांना मिळणार हक्काच्या इमारती ; ३० इमारतींना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 03:41 PM2024-07-30T15:41:51+5:302024-07-30T15:42:47+5:30

Bhandara : तांत्रिक सहमती, ४.७७७ कोटींतून होणार कामे

Talathi offices will get buildings; Approval for 30 buildings | तलाठी कार्यालयांना मिळणार हक्काच्या इमारती ; ३० इमारतींना मंजुरी

Talathi offices will get buildings; Approval for 30 buildings

राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी :
भाड्याच्या घरात असलेल्या तलाठी कार्यालयांना आता हक्काच्या इमारती मिळणार आहेत. तलाठी कार्यालयाच्या शासकीय इमारतीसाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. लवकरच मोहाडी तालुक्यात तीस तलाठी कार्यालय स्वतःच्या इमारतीत दिसून येणार आहेत.


मोहाडी तालुक्यात ३८ तलाठी कार्यालय आहेत. त्यापैकी तीस तलाठी कार्यालयाच्या शासकीय इमारती लवकरच उभ्या राहणार आहेत. त्यासाठी तलाठी कार्यालयासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले. अंदाजपत्रकाची किंमत ४ कोटी ७७ लाख ९२ हजार एवढी आहे. नागपूर सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडून तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली आहे. आता प्रशासकीय मान्यता व निधीच्या उपलब्धतेची प्रतीक्षा संपली आहे. प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्याभरात तलाठी कार्यालयाच्या इमारत बांधकामाची निविदा काढली जाणार असल्याची माहिती मिळाली. तलाठी कार्यालय हक्काची असावीत, यासाठी सातत्याने आमदार राजू कारेमोरे यांनी प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा केला. लवकरच या तलाठी कार्यालयाच्या इमारती उभ्या दिसणार आहेत.


येथे होणार तलाठी कार्यालयाचे बांधकाम
मोहाडी तालुक्यात खुटसावरी, चिचोली, पांजरा, जांब, धुसाळा, नवेगाव, शिवनी, धोपे, सालई खुर्द, उसर्रा, सालई बुटूक, टांगा, डोंगरगाव, कुशारी, रोहा, कान्हळगाव सिर, वडेगाव, मांडेसर, नेरी, सातोना, मोहगाव देवी, दहेगाव, बेटाळा, देव्हाडा बु., मोहगाव बु., मुंढरी बु., जांभोरा, पारडी, पाचगाव, निलज बु. व खडकी या गावांमध्ये तलाठी कार्यालयाच्या नवीन दिमाखदार इमारती तयार केल्या जाणार आहेत.


भाड्याने आहेत कार्यालय
तलाठी कार्यालयाच्या इमारती नव्याने तयार होणार आहेत. पण, हे सगळे तलाठी कार्यालय भाड्याच्या घरात आजही आहेत. भाड्याने दिलेल्या तलाठी कार्यालयाचे भाडे २०१५ पासून थकीत पडलेले आहेत. थकीत भाडे आधी देण्यात यावेत, अशी मागणी भाडे मालकांनी केली आहे.
 

Web Title: Talathi offices will get buildings; Approval for 30 buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.