एक हजाराच्या लाचेसाठी तलाठी अडकला जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 01:49 PM2024-05-17T13:49:45+5:302024-05-17T13:50:16+5:30
Bhandara : शेतीच्या फेरफारसाठी मागितली होती रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरेदी केलेल्या शेतीची रजिस्ट्री झाल्यावर फेरफार करण्यासाठी निव्वळ एक हजार रुपयांची लाच स्वीकारणे पवनी तालुक्यातील तलाठ्याच्या अंगलट आले. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरून लाच स्वीकारतानाच तलाठी अलगद सापळ्यात अडकला. ही कारवाई बुधवारी रात्री ९:४५ वाजता नागपूर नाक्यावर पार पडली. रवींद्र सुभाष पडोळे (३७) असे या तलाठ्याचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी माहितीनुसार, या तक्रारकर्त्याने नेरला (ता. शेती खरेदी केली होती. रजिस्ट्री ७ मे रोजी केलेल्या शेतीचे करण्याकरिता संबंधित रोजी नेरलाचा तलाठी घटनेतील पवनी) येथे त्या शेतीची झाली. खरेदी फेरफार व्यक्तीने ७ मे रवींद्र पडोळे याची भेट घेऊन कागदपत्रे सोपविली. मात्र ११ मे रोजी तलाठ्याने संबंधित व्यक्तीला फोन करून कामासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र ही रक्कम द्यायची नसल्याने संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून १५ मे रोजी रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान, एवढी रक्कम शक्य नसल्याचे सांगत तडजोड एक हजार रुपयांपर्यंत केली. ठरल्यानुसार, बुधवारी रात्री साडेनऊ वाजता तलाठ्याला रक्कम घेण्यासाठी नागपूर नाक्यावर बोलावले. अगदी चौकातच ही एक हजार दिलेल्या ही रुपयांची रक्कम स्वीकारत असताना सापळा रचून असलेल्या पथकाने ९:४५ वाजता त्याला नोटांसह रंगेहात अटक केली.
विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप.अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या पुढाकारात पोलिस निरीक्षक अमित डहारे यांनी ही कारवाई केली. या पथकात पोलिस नाईक अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, शिपाई चेतन पोटे, मयूर सिंगनजुडे, राजकुमार लेंडे, चालक राहुल राऊत सहभागी होते.
पहाटेपर्यंत चालली कारवाई
अटकेनंतर तलाठी रवींद्र पडोळे याला अटक करून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. ही कारवाई पहाटे ४ वाजेपर्यंत चालली. गुरुवारी दुपारनंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.