ग्रामीण खेळाडूंमध्ये प्रतिभा : प्रतीक्षा कटरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 AM2021-01-18T04:32:08+5:302021-01-18T04:32:08+5:30
अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव रहमतकर हे होते. अतिथी म्हणून माजी जि. प. सभापती धनेंद्र तुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव रहमतकर हे होते. अतिथी म्हणून माजी जि. प. सभापती धनेंद्र तुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, रामदयाल पारधी, अमृतलाल पटले, राजेंद्र ढबाले, उमेश तुरकर, सरपंच नितीन गणवीर, मार्कंड राणे, मुस्ताक कुरेशी, सुकलाल सिंदपुरे, माणिक आगाशे, भूपेन पटले, इंद्रपालसिंग सोलंकी, देवानंद वासनिक, विजय पटले, मधुकर कटरे, सुखश्याम येडे, दिनेश मेश्राम, रवी दमाहे, पेशनेजी, सुखचंद ठाकरे, आयोजक पंचशील क्रिकेट क्लबचे सदस्य बालू कटरे व त्यांची चमू व सिलेगाव, वाहनी, सिंदपुरी, परसवाडा येथील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चुल्हाड जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या चुल्हाड, सिंधपुरी, वाहनी, पिपरी चुन्नी, वांगी, मांडवी, वाहणी, परसवाडा, रेंगेपार, पांजरा, कर्कापूर, तामसवाडी, हरदोली गावातील एकूण ३२ चमू सहभागी होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन मोहगाव खदानचे सरपंच उमेश कटरे यांनी केली. सदर कार्यक्रमात विजेत्या टीमला प्रथम बक्षीस म्हणून २१,००० रुपये, द्वितीय बक्षीस १५,००० रुपये, तृतीय बक्षीस ११,००० रुपये मॅन ऑफ द सिरिज २१०० रुपये, मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचला पाचशे रुपये, तर सहभागी होणार्या प्रत्येक खेळाडूला एक टी-शर्ट व प्रोत्साहनपर घड्याळ देण्यात येणार आहे. या ३२ चमूपैकी चांगले खेळाडू निवडून भविष्यात चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांगल्या खेळाडूंची निवड करून त्यांना कोचिंगसाठी पाठवण्यात येईल, जेणेकरून भविष्यात चांगले खेळाडू निर्माण होतील, अशी माहिती मोहोगावचे सरपंच उमेश कटरे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालू कटरे यांनी केले तर प्रस्तावना मोहगावचे सरपंच उमेश कटरे यांनी केली. आभार पंचशील क्रिकेट टीमचे सदस्य कृनाल गजभिये यांनी मानले. कार्यक्रमामध्ये बालू कटरे, कृणाल गजभिये, निखिल नागदेवे, सुदर्शन नगरधने, गणेश किंदरले, निखिल नागदेवे, शुभम पारधी, सुभाष किंदरले, मजहर सिद्धीकी, पंकज खडसंन, साबीर सय्यद, कशिश गजभिये, विक्रम काटवले, विलास राऊत, अविनाश राणे यांनी सहकार्य केले.