तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली शिवारफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:04 PM2018-01-28T22:04:49+5:302018-01-28T22:05:35+5:30

शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार नवनवे तंत्र अवगत व्हावे याकरिता तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या.

Taluka Agriculture Officer Kelly Shire Ferry | तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली शिवारफेरी

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली शिवारफेरी

Next
ठळक मुद्देदशपर्ण औषधांचे प्रात्यक्षिक : ठिंबक योजनेचे शेतकऱ्यांना सांगितले महत्त्व

आॅनलाईन लोकमत
पालांदूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार नवनवे तंत्र अवगत व्हावे याकरिता तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या.
शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या उसमस्यांची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत उपस्थितीत प्रश्नांना यथोचित उत्तरे देत शेतकऱ्यांच्या वास्तव प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी शेतकरी गोकुल राऊत यांनी फुलकवलेली ब्रोकोली, मल्पिंगवर भेंडी, ठिंबकच्या आधारे लावलेली बाग यावेळी सगळ्यांना आकर्षणाचे केंद्र ठरले. शिवारफेरीत तालुका कृषी अधिकारी पी.पी. गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके, कृषी पर्यवेक्षक शिल्पा खंडाईत, चुडामन नंदनवार, यांच्यासह विजय ब्राम्हणकर, श्रीपत द्रुगकर, रुपेश भुसारी, शिवाजी कोरे आदी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी दशपर्ण अंकीत शेळी न खाणारी वनस्पती, पाने, गावरान गाईचे गोमुत्र व शेण यांचे मिश्रण ३० दिवस पाण्यात कुजत ठेऊन दररोज घोळत गुणकारी औषध तयार होते. हे २०० लिटर पाण्यात प्रती एकरात स्प्रे पंपाद्वारे फवारणी करावी. यामुळे पिकांचे पूर्णपणे संरक्षण होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठिंबक सिंचनात ७० टक्के पाण्याची बचत शक्य असून कमी पाण्यात व्यवस्थित पीक व्यवस्थापन शक्य असल्याचे माल्चींग वरील भेंडी पिकाच्या प्रात्यक्षिकावरून समोर आले. नवीन कृषीतंत्रज्ञान स्वीकारत शेतकºयांनी पुढे यावीत. यामुळे शेतात लक्ष्मीचे दर्शन होत आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज निर्माण होणार नाही. दिवसेंदिवस भूजलसाठा कमी होत आहे. शासनाने एका एकराकरिता ठिंबकचे नियोजन केले आहे.
प्रत्येक बागायती शेतकऱ्यांनी पाटाच्या पाण्याची बागायती न करता ठिंबकची शेती करावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी पी.पी. गिदमारे व मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांनी केले.
कृषी अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

शेतकऱ्यांना पुस्तिका अभ्यासापेक्षा कृषीतून पिकांची वास्तव माहिती पुरवा. ठिंबक सिंचन योजनेत शासनाचा वाटा वाढून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवाची निश्चित खात्री गरजेची असते. बहुधा योजना कंत्राटदाराच्या माथी मारून शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा लाभ घेतला जातो. ठिंबक मध्ये वापरत येणारी न्याहरीन (वेल पाईप लाईन) उत्कृष्ट दर्जाची हवी.
-बळीराम बागडे, प्रगतशील शेतकरी पालांदूर
कृषी अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन कामात कमी लक्ष पुरवित शेतकरी हप्ताभरात किमान तीन दिवस मार्गदर्शन करावे. दरमहा पिकात, हवामानात बाजार होणारी अदलाबदल विषयी माहिती पुरवावी. पालांदूर परिसरातील शेतकरी होतकरू असून पाठीवर थाप मारीत लढ म्हणण्याची प्रेरणादायी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.
-विजय ब्राम्हणकर, मऱ्हेगाव, बागायती शेतकरी.

Web Title: Taluka Agriculture Officer Kelly Shire Ferry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.