रेतीघाट तामसवाडीची जड वाहतूक सीतेपारातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 09:29 PM2018-07-29T21:29:40+5:302018-07-29T21:30:13+5:30

तामसवाडी (पांजरा) रेती घाटावरून जड वाहतूक सितेपार गावातून सुरु आहे. सितेपार रस्ता खड्ड्यात गेला आहे. खनिज विकास निधीतून सितेपार रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. उलट खनिज विकास निधी शहरात खर्च कण्यात येत आहे. रेती घाट तामसवाडी शिवारात जरी असले तरी रेतीची वाहतूक मात्र सितेपार गावातून होते. महसूल तामसवाडीला मिळतो. खड्डेमय रस्त्याचा त्रास सितेपारवासीयांना सहन करावा लागत आहे.

Tamaswadi heavy traffic from Sitapur | रेतीघाट तामसवाडीची जड वाहतूक सीतेपारातून

रेतीघाट तामसवाडीची जड वाहतूक सीतेपारातून

Next
ठळक मुद्देसितेपार रस्ता खड्डेमय : खनीज विकास निधीचा लाभ मिळणार काय?
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तामसवाडी (पांजरा) रेती घाटावरून जड वाहतूक सितेपार गावातून सुरु आहे. सितेपार रस्ता खड्ड्यात गेला आहे. खनिज विकास निधीतून सितेपार रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. उलट खनिज विकास निधी शहरात खर्च कण्यात येत आहे. रेती घाट तामसवाडी शिवारात जरी असले तरी रेतीची वाहतूक मात्र सितेपार गावातून होते. महसूल तामसवाडीला मिळतो. खड्डेमय रस्त्याचा त्रास सितेपारवासीयांना सहन करावा लागत आहे.
तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. तामसवाडी (पांजरा) येथे राज्य शासनाने रेती घाट लिलाव केला होता, परंतु रेतीघाटातून रेती वाहून नेणारे ट्रक, ट्रॅक्टर सितेपार गावातून सर्रास वाहतूक केली जाते. खनिज निधीचा एक पैसाही या गावाला मिळत नाही. उलट रस्ते खड्डेमय रेती वाहतुकीमुळे झाले आहेत. एक ते दीड व दोन फुटाचे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. शासन दरबारी तामसवाडी (पांजरा) हा रेतीघाट आहे. परंतु रेती वाहतकीकरिता केवळ सितेपार येथून वाहतूक केली जाते.
डोंगरला सितेपार रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे आठ किमी परिसरात खनिज विकास निधीतून रस्ते तयार केली जातात. सितेपार हे गाव तर हाकेच्या अंतरावर आहे. तरीसुद्धा मुख्य रस्ता अजूनपर्यंत दुरुस्ती करण्यात आला नाही. येथील ग्रामस्थात असंतोष दिसत आहे. महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

खनीज विकास निधी अंतर्गत सीतेपार रस्ता दुरुस्त करणे विचाराधीन आहे. रेती वाहतुकीमुळे रस्ता खड्डेमय झाला याची माहिती आहे. रस्ते सुरक्षित राहावे त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील.
- गजेंद्र बालपांडे
तहसीलदार तुमसर
तामसवाडी (पांजरा) येथे रेती घाट लिलाव झाला. परंतु प्रत्यक्षात रेती वाहतूक सीतेपार गावातून केली जाते. सितेपार डोंगरला रस्ता खड्डेमय झाला आहे. अपघाताला महसूल प्रशासन जबाबदार राहील.
- गजानन लांजेवार
अध्यक्ष, सरपंच संघटना तुमसर

Web Title: Tamaswadi heavy traffic from Sitapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.