तंटामुक्त गाव मोहिमेचे काम थंडावले
By Admin | Published: December 29, 2014 11:37 PM2014-12-29T23:37:56+5:302014-12-29T23:37:56+5:30
राज्य शासनाच्या गृह खात्यामार्फत राज्य तंटामुक्त करण्याचे उद्दिीट ठेवून आठ वर्षांपूर्वी सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता थंडावल्याचा प्रयत्य दिसून येत आहे. या मोहिमेच्या
भंडारा : राज्य शासनाच्या गृह खात्यामार्फत राज्य तंटामुक्त करण्याचे उद्दिीट ठेवून आठ वर्षांपूर्वी सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता थंडावल्याचा प्रयत्य दिसून येत आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी पोलीस व महसूल प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज असताना सध्या या दोन्ही विभागाचे या मोहिमेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
‘शांततेकडून समृद्धीकडे’ असे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावातील तंटे गावपातळीवरच मिटवून गावात शांतता प्रस्थापित व्हावी, नागरिकांच्या श्रम व पैशाची बचत होऊन महाराष्ट्र देशात आदर्श राज्य ठरावे, आदी उदात्त हेतूंनी या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता. मागील काही वर्षात शेकडो गावे तंटामुक्त करण्यात आली. अनेक गावांमधून या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. हजारो गावांनी स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी होऊन हजारो तंटे गावातच तडजोडीने मिटविले. यामध्ये फौजदारी, दिवाणी व महसूल या सोबतच मोठ्या तंट्यांचाही समावेश होता. सर्व छोटे-मोठे तंटे गावातील तंटामुक्त गाव समित्यांनी गावातच मिटविण्याचा विक्रम राज्यभर करून अन्य राज्यांसमोर आदर्श निर्माण केला. या तंटामुक्त गावांना शासनानेही लोकसंख्येच्या प्रमाणात एक लाखांपासून ते दहा लाखांपर्यंतची रोख बक्षिसे देऊन सन्मानित केले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत १५ आॅगस्ट ते ३० एप्रिलपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यंदा मोहिमेचे आठवे वर्ष आहे.
सन २०१४ या वर्षाला प्रारंभ होऊन सुमारे आठ महिने झाले आहे. परंतु या मोहिमेमध्ये आवश्यक तो प्रतिसाद आणि उत्साह दिसून आलेला नाही. या मोहिमेचे तालुकास्तरावर तहसीलदार हे अध्यक्ष असतात. संबंधित ठाण्याचे ठाणेदार सचिव असतात. पोलीस पाटील समितीचे निमंत्रक असतात. या तंटामुक्त गाव समितीच्या वर्षातून किमान तीन ते चार बैठका घेऊन संपूर्ण गावाला मोहिमेत सक्रिय करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम समितीला करावे लागते. परंतु, तालुक्यातील कोणती गावे यंदा या मोहिमेत सहभागी झाली, याची नोंद पोलीस ठाण्यात अद्यापही दिसत नाही. तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी गावानी राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्र मांसाठी तीन नोंदवह्या अद्ययावत ठेवाव्या लागतात. परंतु अनेक गावांना अजूनही नोंदवही देण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर मोहीम थंडीच्या हंगामात थंडावल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी प्रत्येक पोलीस ठाण्याला तंटामुक्त गावासाठी उद्दीष्ट दिले जाते. त्यानंतर सर्वांची एकाचवेळी धावपळ सुरू होते. परंतु, आतापासून तालुकास्तरीय समितीने लक्ष दिल्यास वेळेवरची धावपळ टाळता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)