तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:42 PM2019-08-04T22:42:43+5:302019-08-04T22:42:58+5:30
तालुक्यातील अंजनेय तंत्रनिकेतनच्या सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक समस्येला घेऊन तुमसर पोलीस ठाण्यात धडक दिली. शैक्षणिक शुल्क घेऊन कॉलेज प्रशासनाकडून एकही तासीका अद्यापपर्यंत घेण्यात आली नाही. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करुन शैक्षणिक नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील अंजनेय तंत्रनिकेतनच्या सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक समस्येला घेऊन तुमसर पोलीस ठाण्यात धडक दिली. शैक्षणिक शुल्क घेऊन कॉलेज प्रशासनाकडून एकही तासीका अद्यापपर्यंत घेण्यात आली नाही. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करुन शैक्षणिक नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
येथील कर्मचाऱ्यांनीही महाविद्यालय प्रशासन वेतन देत नाही अशी तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात रविवारला केली.
खैरलांजी येथील अंजनेय तंत्रनिकेतन, महाविद्यालयात शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून आजपर्यंत तासीका लागल्या नाही. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क घेतले, परंतु तासिका घेण्यात आल्या नाही. वार्षिक शिष्यवृत्ती सुध्दा महाविद्यालयाने परत केली नाही. येथील सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. महाविद्यालय प्रशासनाने येथील विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करुन शैक्षणिक नुकसान केले आहे. ४५ विद्यार्थ्यांनी रविवारी तुमसर पोलीस ठाण्यात संस्थेविरुध्द तक्रार दिली. येथील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. नियमित कामे करुन महाविद्यालय प्रशासन वेतन देत नाही.
येथील कर्मचाºयांनीही रविवारी महाविद्यालय प्रशासनाविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विद्यार्थ्यांचे नेतृत्व प्रदेश एनएसयुआयचे प्रदेश सचिव शुभम गभने, माजी आ. अनिल बावनकर, प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितिरमारे, पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे, सरपंच गजानन लांजेवार, शुभम साठवणे यांनी केले.