स्मशानभूमीत उभारला ताडपत्रीचा सभामंडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:30+5:302021-07-02T04:24:30+5:30

०१ लोक ०५ के चुल्हाड (सिहोरा) : लोकप्रतिनिधींनी सभा मंडप बांधकामासाठी निधी दिला नसल्याने गावकऱ्यांनी दु:खितांना मायेचा आधार देण्यासाठी ...

A tarpaulin hall was erected in the cemetery | स्मशानभूमीत उभारला ताडपत्रीचा सभामंडप

स्मशानभूमीत उभारला ताडपत्रीचा सभामंडप

Next

०१ लोक ०५ के

चुल्हाड (सिहोरा) : लोकप्रतिनिधींनी सभा मंडप बांधकामासाठी निधी दिला नसल्याने गावकऱ्यांनी दु:खितांना मायेचा आधार देण्यासाठी थेट स्मशानभूमीत ताडपत्रीचा मंडप उभारला आहे. बिनाखीवासीयांनी प्रेरणादायी निर्णय घेतला असल्याने कौतुक होत आहेत.

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात असणाऱ्या स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अनेक निवेदने दिली आहेत. गावकऱ्यांना बेदखल करण्यात आले आहे. स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधकाम मंजूर करण्याची ओरड होती. पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले नसल्याने गावकऱ्यांनी थेट लोकसहभागातून पुलाचे बांधकाम केले आहे. यामुळे मृतदेह नेताना त्रास कमी झाला आहे. नाल्यापासून स्मशानभूमीपर्यंत पक्का रस्ता नाही. पायवाटेने जावे लागत आहे. लोकप्रतिनिधी व शासनाच्या उदासीनतेमुळे गावकरी चांगलेच संतापले आहेत. याच स्मशानभूमीत आप्तस्वकियांसाठी सभामंडप मंजूर करण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून करीत आहेत. गावकऱ्यांना ‘तारीख पे तारीख’ दिल्या जात आहेत. स्मशानभूमीत ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने झाडाचा आश्रय आप्तस्वकीय घेत आहेत. याच झाडात शोकसभा घेण्याची वेळ आप्तस्वकियांवर आली आहे. आधीच दुःखात असणाऱ्या आप्तस्वकियांना आधार व सेवा देण्यासाठी उदासीनता दिसून येत असल्याने गावकऱ्यांनी लोकसहभागातून ताडपत्रीचा सभामंडप तयार करण्याचा निर्णय घेतला. स्मशानभूमीत ताडपत्रीचा सभामंडप तयार केल्याने ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी मदतीचे ठरत आहे. गावकऱ्यांनी दु:खितांना मायेचा आधार देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. स्मशानभूमीत सभामंडप उभारल्यानंतर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. सामान्य जनतेला सुविधा देण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचा अनुभव गावकरी घेत आहेत. स्मशानभूमीत रस्ता, पूल, सभामंडप, बोअरवेल्स मंजूर करण्यात येत नाही. जिल्हा परिषदअंतर्गत अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजना स्मशानभूमीत पोओचल्या नाहीत. गावाला विकासाच्या बाबतीत उपेक्षित ठेवण्यात येत असल्याचे आरोप गावात होत आहेत.

"स्थानिक स्मशानभूमीत रस्ता, पूल, बोअरवेल्स, सभामंडप बांधकाम मंजूर करण्यासाठी अनेक निवेदने दिली आहेत. परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. यामुळे लोकसहभागातून सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. ताडपत्रीचा मंडप उभारण्यात आल्याने ऊन व पावसापासून संरक्षण करण्यासाठी मदतीचे ठरत आहे. या समस्येकडे लक्ष घातले पाहिजे.

देवेंद्र मेश्राम, माजी उपसरपंच, बिनाखी

Web Title: A tarpaulin hall was erected in the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.