तुमसर बाजार समिती झाली ‘कॅशलेस’

By admin | Published: January 2, 2017 01:23 AM2017-01-02T01:23:23+5:302017-01-02T01:23:23+5:30

नोटाबंदीमुळे केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहार सुरू करण्याचे आवाहन केले होते.

Tasamar Bazar committee gets 'cashless' | तुमसर बाजार समिती झाली ‘कॅशलेस’

तुमसर बाजार समिती झाली ‘कॅशलेस’

Next

तुमसर : नोटाबंदीमुळे केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहार सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत ८ नोव्हेंबरनंतर १५ कोटी रूपयांची धान खरेदी कॅशलेस व्यवहाराअंतर्गत धनादेशाने करण्यात आले. ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनात रद्द करण्याची घोषणा झाली त्यावेळी तुमसर बाजार समितीमध्ये धानाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली.
राज्यात धान तथा तांदूळ खरेदी-विक्रीत तुमसर बाजार समिती अव्वलस्थानी आहे. मध्यप्रदेशातूनही येथे धान विक्रीकरिता येते. सुरूवातीला उधारी व काही प्रमाणात रोखीने धान खरेदी केली जात होती. परंतु हजारो शेतकऱ्यांना नगदी रक्कम कुठून देणार असा प्रश्न व्यापारी तथा अडत्या, दलालांना पडला होता. या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी कॅशलेसचा तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. अडत्या, व्यापारी, मापारी यांनी धनादेश देण्याची सुरूवात केली. सुरूवातीला शेतकऱ्यांनी विरोध केला, परंतु कॅशलेस व्यवहार हाच पर्याय असल्याचे समजावून सांगितल्यावर शेतकऱ्यांनी होकार दिला.
कॅशलेस व्यवहाराकरिता तुमसर बाजार समितीमध्ये सर्वांना सूचना देण्यात आली होती. शेतकऱ्यांची खाती बँकेत उघडण्यात आली. त्यासाठी बँक अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. स्टेट बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. आतापर्यंत १५ कोटी रूपयांचे चुकारे धनादेशाद्वारे देण्यात आले. मार्च महिन्यापर्यंत ६० कोटींची धान विक्री होण्याची शक्यता आहे.
कॅशलेस व्यवहाराकरिता संचालक मंडळ व व्यापारी, अडते, दलाल यांच्याशी चर्चा करून सामूहिक प्रयत्न केले. येणाऱ्या काळात सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल, असे बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

कॅशलेस व्यवहाराकरीता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आली. आता शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पारदर्शी व्यवहार व तातडीने पैसे देण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे.
-अनिल भोयर,
सचिव बाजार समिती तुमसर.

Web Title: Tasamar Bazar committee gets 'cashless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.