स्वयंपाकाची चव महागली; मसाला दरात दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:41 AM2021-08-20T04:41:32+5:302021-08-20T04:41:32+5:30
भंडारा : वातावरणातील बदलामुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त झाल्यानंतर आता वाढत्या महागाईमुळे दुहेरी फटका बसत आहे. लॉकडाऊनपासून आतापर्यंत ...
भंडारा : वातावरणातील बदलामुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त झाल्यानंतर आता वाढत्या महागाईमुळे दुहेरी फटका बसत आहे. लॉकडाऊनपासून आतापर्यंत मसाल्यांची किमतीची तुलना केल्यास किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. मसाल्याच्या किमती गगनाला भिडल्याने अनेक खवय्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अलीकडेच मसाल्यांच्या दरामध्ये दुप्पटीने वाढ झाल्याने गृहिणींनाही मसाल्याअभावी स्वयंपाक करावा लागत आहे. परिणामी घरच्यांचे टोमणे ऐकावे लागत आहे.
महागाईपाठ सोडेना !
कोट
इंधन दरवाढीनंतर सिलिंडर गॅस, मसाले, ड्रायफ्रुटच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. महागाई मानगुटीवर बसल्याने अंदाजपत्रक बिघडले असून घरात चिडचिड होत आहे.
- रंजू भुते, गृहिणी
कोट
कोरोनामुळे संकटाचा सामना करावा लागला. आता महागाई वाढल्याने घर चालविणे कठीण झाले आहे. भाजी तयार करताना मसाल्याची गरज असते. मात्र, आता ही चव महागाईने हिरावली आहे.
- नंदा सार्वे, गृहिणी
म्हणून वाढले मसाल्याचे दर
कोट
मसाले हे पदार्थ बहुतांश परदेशातून येत असतात. मात्र, कोरोनाचे संकट पाहता मसाले देशात येणे बंद झाले आहे. परिणामी मसाल्यांच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहे.
- अनिल चरडे, व्यापारी.
कोट
अफगानिस्तानातील स्थिती व परदेशातून येणारा मसाला, सुका मेवा बंद आहे. अलीकडे इंधन दरवाढीचा परिणामी या पदार्थांवर बसला असून यापुढे देखील दरवाढ होण्याची शक्यता आहे.
- आशिष खेडीकर, व्यापारी