टी.सी.करिता विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:08 AM2019-06-17T01:08:12+5:302019-06-17T01:08:53+5:30
सिहोरा येथील एका शाळेच्या दोन संस्थेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही. याप्रकरणी थेट विद्यार्थ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात धडक दिली. सोमवारी १७ जून रोजी शिक्षणाकाऱ्यांनी सिहोरा येथे येऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्याची ग्वाही दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सिहोरा येथील एका शाळेच्या दोन संस्थेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही. याप्रकरणी थेट विद्यार्थ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात धडक दिली. सोमवारी १७ जून रोजी शिक्षणाकाऱ्यांनी सिहोरा येथे येऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलकर्ते विद्यार्थी माघारी परतले. सोमवारी सदर तिढा सुटतो की पुन्हा चिघळतो याकडे पालकासह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
सिहोरा येथे महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असून येथे दोन संस्थेचा वाद मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. एका संस्थेच्या प्रस्तावावर शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी मुख्याध्यापक पदाला मान्यता दिली. तर दुसºया संस्थेने त्यावर आक्षेप घेतला. येथे मुख्याध्यापक पदावरुन दोन संस्थेत वाद सुरु आहे. संस्थेबाबत व मुख्याध्यापक पदासंदर्भात प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहे.
इयत्ता दहावी व बारावी परिक्षेचा निकाल जाहिर झाला. बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून मिळणे क्रमप्राप्त आहे, परंतु संस्थेच्या वादामुळे शाळा सोडल्याचा दाखल्यावर स्वाक्षरी कोण करणार अशी मुख्य समस्या निर्माण झाली आहे. शाळेच्या रेकॉर्ड कुठे आहे, कुणाजवळ आहे. इत्यादी प्रश्न येथे उपस्थित झाले आहे. दररोज विद्यार्थी शाळेत दाखल्याकरिता जातात व रिकाम्या हाताने परत येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट सिहोरा पोलीस स्टेशनवरच धडक दिली.
आम्हाला शाळा सोडल्याचा दाखला हवा, अन्यथा संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात लावून धरली. पोलीस ठाण्यात तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर, सिंदपूरीचे मोरे, पं.स. सदस्य हिरालाल नागपूरेसह सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या भेटीला गेले. कालम शेख यांनी शिक्षणाधिकारी काटोलकर यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. सोमवारी शिक्षणाधिकारी काटोलकर व त्यांचे प्रतिनिधी सिहोरा येथे महाराष्ट्र शाळेत दाखल होऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थी पोलीस ठाण्यातून माघारी परततले. सिहोऱ्याचे ठाणेदार गायकवाड यांनी प्रकरण योग्यरितीने हाताळले.
सिहोरा येथील महाराष्ट्र शाळेत दोन संस्थेचे वाद सुरु आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल्याची समस्या दूर न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
- कलाम शेख, माजी सभापती पं.स. तुमसर
सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांची मुले महाराष्ट्र शाळेत शिक्षण घेत आहेत. शाहेच्या वादाशी विद्यार्थ्यांना काही देणे-घेणे नाही. विद्यार्थ्यांची समस्या सोमवारी न सुटल्यास अधिकाºयांना घेराव करण्यात येईल.
- शुभम गभने, प्रदेश सचिव एनएसयुआय,तुमसर