शिक्षकच चांगला माणूस घडविणारी शक्ती

By admin | Published: February 4, 2016 12:41 AM2016-02-04T00:41:30+5:302016-02-04T00:41:30+5:30

आजच्या स्पर्धेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी चांगले तेवढे घ्यावे व वाईट सोडून द्यावे. शिक्षकच चांगला माणूस घडविणारी शक्ती आहे,

A teacher is a good person's power | शिक्षकच चांगला माणूस घडविणारी शक्ती

शिक्षकच चांगला माणूस घडविणारी शक्ती

Next

गुणवंतांचा सत्कार : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : आजच्या स्पर्धेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी चांगले तेवढे घ्यावे व वाईट सोडून द्यावे. शिक्षकच चांगला माणूस घडविणारी शक्ती आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा समारंभ प्रसंगी आमदार रामचंद्र अवसरे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम.एल. धारगावे हे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड, सचिव गुलशन गजभिये, उपाध्यक्ष रमेश बागडे, डॉ. भैय्यालाल गजभिये, सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे, विद्यार्थी संसदेचा प्रतिनिधी मारवाडे उपस्थित होते.
अमृत बंसोड म्हणाले, वाचनाबरोबर चिंतन महत्वाचे आहे, तरच प्रगती होते. युक्तीवादातून ज्ञान मिळते. याप्रसंगी महेंद्र कनिष्ठ महाविद्यालयाचे महेंद्र या हस्तलिखिताचे मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
मार्च २०१५ च्या बोर्ड १२ वीच्या परीक्षेत कॉलेजमध्ये सर्व विषयावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा दानशुर व्यक्ती व शिक्षकांकडून रोख पारितोषिक व स्मृती चिन्हे अ‍ॅड. रामचंद्र अवसरे व उपस्थित शिक्षकांद्वारे देण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
संचालन शुभांगी बंसोड यांनी केले. आभार सुलोचना कुंभारे यांनी मानले. यशस्वितेसाठी विनोद मेश्राम, सुधाकर साठवणे, मोरेश्वर गेडाम, चाचेरे, जे.वाय. निंबार्ते, मिर्झा, निर्वाण, धांडे, आनंद गजभिये, प्रदीप गजभिये, धनराज मते व विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे योगदान लाभले. (वार्ताहर)

Web Title: A teacher is a good person's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.