विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मिळाले शिक्षक
By admin | Published: September 15, 2015 12:31 AM2015-09-15T00:31:38+5:302015-09-15T00:31:38+5:30
जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय मोहाडी येथे विज्ञान शाखेतील इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या दोन विषयाचे शिक्षकच नसल्याने नवीन सत्र सुरु झाल्यापासून या विषयाचे वर्गच लागले नाही.
शैक्षणिक नुकसान : पाच महिन्यापासून इंग्रजी, भौतिकशास्त्राचे वर्ग नाही
मोहाडी : जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय मोहाडी येथे विज्ञान शाखेतील इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या दोन विषयाचे शिक्षकच नसल्याने नवीन सत्र सुरु झाल्यापासून या विषयाचे वर्गच लागले नाही. अखेर विद्याथ्योनी १४ सप्टेंबरला शाळा बंद आंदोलन केले आणि जिल्हा परिषद प्रशासनाला नमते घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. शेवटी आंदोलन मागे घेण्यात आले.
येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालयात मागील पाच महिन्यापासून वरील दोन विषयाचे शिक्षक नसल्याने हे विषयच शिकविण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्यांनी वारंवार गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटी शाळा बंद आंदोलन पुकारले. आज इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकून गेटजवळच ठिय्या मांडला. शेवटी शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथील यावलकर व देव्हारे या दोन शिक्षकांच्या नियुक्तीचे पत्र मोहाडीला पाठविले व विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. शेवटी शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांनी एक वाजता आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनासाठी शाळा नायक प्रतिक पंचभाई, विद्यार्थिनी प्रतिनिधी राणी मलेवार, हेमंत मलेवार, चारुलता गभणे, दिनेश मारबते, समीर कोहळे, गुंजन चिंधालोरे, मंगेश चन्ने, मनोज गिरीपुंजे, अक्षय लांजेवार, दिव्या म ेहर, अस्मिता भिमटे, प्रियंका हेडाऊ, आंचल सोरते, भाग्यश्री बडवाईक, ज्योती ढबाले विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
इंग्रजी व भौतिक शास्त्राचे शिक्षक गुरुवार ते शनिवारला तीन दिवस भंडारावरून येथे येऊन शिकवतील व सोमवार ते बुधवार तीन दिवस येथीलच शिक्षक अधिकचा वर्ग घेऊन शिकविणार आहेत.
- पुष्पा बडवाईक,
प्राचार्या जि.प. महाविद्यालय मोहाडी