शिक्षकांचा ‘आक्रोश’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:58 PM2017-11-04T23:58:37+5:302017-11-04T23:59:22+5:30

देशाची भावी पिढी घडविणाºया शिक्षकांच्या विविध समस्या शासनाकडे प्रलंबित आहे. यावर प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहे.

Teachers 'Aakrosh Morcha' | शिक्षकांचा ‘आक्रोश’ मोर्चा

शिक्षकांचा ‘आक्रोश’ मोर्चा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : शिक्षकांनी घोषणांमधून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशाची भावी पिढी घडविणाºया शिक्षकांच्या विविध समस्या शासनाकडे प्रलंबित आहे. यावर प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहे. या मोर्चेकरांनी शासनाविरूद्ध 'आक्रोश' व्यक्त करताना शासकीय अधिकारी व मंत्र्यांविरूद्ध घोषणाबाजी करून त्यांचा आक्रोश व्यक्त केला.
भंडारा जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व मुबारक सैय्यद, रमेश सिंगनजुडे, मुकेश मेश्राम, ओमप्रकाश गायधने, संदीप वहिले, धनंजय बिरणवार, सुधाकर ब्राम्हणकर, ईश्वर नाकाडे, हरीकिसन अंबादे, ईश्वर ढेंगे, रमेश पारधीकर, युवराज वंजारी, मुकूंद ठवकर, वसंत साठवणे, गिरीधारी भोयर, केशव बुरडे, संजीव बावनकर, सुधीर वाघमारे आदींनी केले. शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात धडकला. या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. मोर्च्यादरम्यान संतप्त शिक्षकांनी त्यांच्या न्याय मागण्या पूर्णकरण्यासाठी प्रशासन हतबल झाले असल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली. यावेळी शिक्षकांचा रोष शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांचेविरूद्ध प्रकर्षाने आढळून आला. दरम्यान या मोर्चाला कृती समितीच्या नेत्यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची शिष्टाई
जिल्ह्यातील शेकडो शिक्षक रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध व्यक्त करीत असल्याची गंभीर बाब लक्षात येताच भंडारा नगर पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी मोर्चेकºयांची त्रिमुर्ती चौकात भेट घेतली. यावेळी त्यांनी आमदार परिणय फुके यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याची शिष्टाई केली. मात्र फुके यांच्याशी संपर्क होवू न शकल्याने मेंढे यांनी शिक्षकांचे एक शिष्टमंडळ मुंबईला नेऊन सर्व प्रलंबित मागण्यांचा न्यायनिवाळा करण्याचे आश्वासन यावेळी मोर्चेकºयांना दिले.
नायब तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन
गुरूनानक जयंती असल्याने शासकीय सुट्टी घोषित झाली होती. दरम्यान शिक्षकांनी काढलेल्या मोर्च्याचे निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी मुख्यालयी नव्हते. त्यामुळे मोर्चेकरांच्या निवेदनाची प्रत स्विकारण्याची जबाबदारी भंडारा तहसिल कार्यालयाचे नायब तहसीलदार वाकलकर यांच्यावर सोपविली होती. त्यांनी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाकडून त्यांच्या मागणीचे निवेदन स्विकारले.
या आहेत मागण्या
२३ आॅक्टोबर २०१७ च्या शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या सर्वच शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, २०१७ च्या बदली धोरणात बदल करून सर्व समावेशक बदली धोरण राबवावे, मुख्याध्यापक व शिक्षकांकडे आॅनलाईनचे काम देण्यात येवू नये यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
अध्यादेशाची केली होळी
२३ आॅक्टोबर २०१७ च्या शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षकांनी मोर्चा काढला. दरम्यान त्यांनी शिक्षकांविरूद्ध शासनाने काढलेल्या शासकीय अध्यादेशाची मोर्चास्थळी होळी करून त्यांच्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

Web Title: Teachers 'Aakrosh Morcha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.