महाराष्ट्र शिक्षक संघात शिक्षकांचा प्रवेश
By admin | Published: May 12, 2016 12:50 AM2016-05-12T00:50:51+5:302016-05-12T00:50:51+5:30
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका वढविणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून साकोली येथील कार्यक्रमात अनेक शिक्षकांनी संघात प्रवेश केला.
साकोलीत कार्यक्रम : निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशाने संघाची ताकत वाढली
भंडारा : शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका वढविणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून साकोली येथील कार्यक्रमात अनेक शिक्षकांनी संघात प्रवेश केला. ही प्रवेश प्रक्रिया बुधवारी झालेल्या कार्यक्रमात पार पडली.
जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक आठवडाभरावर येऊन पोहचली नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोलीतील कार्यक्रमात शिक्षकांनी केलेल्या या प्रवेशाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची ताकत वाढली आहे.
स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे साकोली तालुका कार्यवाह अशोक हजारे यांच्यासह शिक्षकांनी संघात प्रवेश केला आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी त्यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यांच्या कार्यप्रणाली व नेतृत्वावर विश्वास ठेवून अशोक हजारे यांच्यासह अनेक शिक्षकांनी जाहीर प्रवेश केला. यापूर्वीही भंडारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्यासह शिक्षक नेते धनंजय बिरणवार, पतसंस्था अध्यक्ष विकास गायधने, गोंदिया जिल्हा सरचिटणीस एस.यु. वंजारी, भंडारा जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, दिलीप बावनकर, चंद्रशेखर गिऱ्हेपुंजे, संजीव बावनकर, राजेश सूर्यवंशी, राजन सव्वालाखे, विकास वाघाडे, राकेश चिचामे, संजीव खंडाईत, शे.रा. हटवार, रवींद्र हटवार, फुलबांधे यांच्यासह संघाचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)