शिक्षक उज्ज्वल भारताचा अविभाज्य घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:37 AM2021-08-26T04:37:19+5:302021-08-26T04:37:19+5:30
अनुराग अध्यापक महाविद्यालय येथे शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांकरिता आयोजित व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य प्रा. ...
अनुराग अध्यापक महाविद्यालय येथे शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांकरिता आयोजित व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य प्रा. सुनंदा आंबिलकर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरण येळणे, प्रा. भावना डुंभरे, प्रा. मृणाल माकडे उपस्थित होते. यावेळी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील पावरपॉइंट प्रेझेंटेशन करताना प्रा. नरेश आंबिलकर यांनी मानवी व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा झाला याचा क्रम समजावून दिला. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू असण्याची गरज सांगून शिक्षकांना स्वतःच्या हावभावापासून ते विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची किती गरज असल्याचे सांगितले. शिक्षकांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत राहणे आज गरजेचे असून, पुस्तकांचे वाचन हे त्याच्या ज्ञानाचे प्रत्याभरणासाठी प्रयत्नरत असावे, असे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध चित्रफीत दाखवून व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिकवणी हे व्रत असून, शिक्षकांनी या व्रतासाठी आवश्यक कला, गुण आत्मसात करावे असे विचार प्राचार्य सुनंदा आंबिलकर यांनी सांगितले. यावेळी जागतिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महापुरुषांचे उदाहरण देऊन शिक्षण क्षेत्राचे अनेक पैलू विस्ताराने मांडण्यात आले. शिक्षक प्रशिक्षणार्थी अमेय पांचालो यांनी सूत्रसंचालन केले. पूजा उजवणे यांनी प्रास्ताविक केले, तर शेहेरबानो खान हिने आभार मानले. यावेळी शिक्षण प्रशिक्षणार्थी मोनिका ढबाले, दया मसंद, हिना लालवानी, कल्याणी कुंभारे, आदी उपस्थित होते.
230821\4705151-img-20210823-wa0050.jpg
मार्गदर्शन करताना प्रा नरेश आंबिलकर