शिक्षक हे सामाजिक अभियंते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:05+5:302021-03-24T04:33:05+5:30
कृपाचार्य बोरकर : सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांचा सत्कार तुमसर : शिक्षक हे समाज घडविण्याचे कार्य करतात त्यामुळे त्यांना सामाजिक ...
कृपाचार्य बोरकर
: सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांचा सत्कार
तुमसर : शिक्षक हे समाज घडविण्याचे कार्य करतात त्यामुळे त्यांना सामाजिक अभियंते असे संबोधले जाते. समाज व राष्ट्र उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षक हे कधीच सेवानिवृत्त होत नाही. शिक्षकांनी निवृत्तीनंतर समाज कार्याकडे वळून समाजाला शिक्षणाचे धडे द्यावे, असे आवाहन निवृत्त पशुवैद्यकीय सह उपसंचालक डॉ. कृपाचार्य बोरकर यांनी केले.
ते शैक्षणिक व सांस्कृतिक सुधारणा मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष पी.एम. नाकाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्थेचे उपाध्यक्ष ए. एन. पंचभाई, सचिव डी.बी. हरणे उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव रहमतकर, एम. एम. खोबरागडे, झेड. डी पुष्पतोडे व शिक्षक एम. एस.. डोंगरे, वाय. पी. बांते, प्रा. एल. एस. झलके, झेड. डी. पुस्तोडे, एस. डब्ल्यू. भेलकर, वरिष्ठ लिपिक एन. के. गोपाले यांचा डॉ. कृपाचार्य बोरकर व पी.एम. नाकाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक एस.जी. पाठक, मोहन भोयर, जे.यु नागपुरे यांनी संबोधित केले.
संचालन खजिनदार एम. एस. गोपाले तर आभार संचालिका उर्मिला कटरे यांनी मानले. यावेळी संचालक सी. डी. परिहार, प्रा.विद्यानंद भगत, के.एम. दिघोरे, व्यवस्थापक के. एस. रहांगडाले व सह व्यवस्थापक नितेश हलमारे उपस्थित होते.