शिक्षक परिषद संघटना शिक्षकांच्या पाठीशी

By admin | Published: February 12, 2017 12:27 AM2017-02-12T00:27:55+5:302017-02-12T00:27:55+5:30

ज्या शाळांची पटसंख्या कमी झाली अशा शाळामधील सेवाजेष्ठ यादी तसेच अतिरिक्त ठरविण्याची मार्गदर्शक तत्वे अटी, शर्ती व नियमांच्या अधिन राहून...

Teachers Council Association support teachers | शिक्षक परिषद संघटना शिक्षकांच्या पाठीशी

शिक्षक परिषद संघटना शिक्षकांच्या पाठीशी

Next

बेहलपाडे : नियमबाह्य अतिरिक्त शिक्षक प्रकरण
भंडारा : ज्या शाळांची पटसंख्या कमी झाली अशा शाळामधील सेवाजेष्ठ यादी तसेच अतिरिक्त ठरविण्याची मार्गदर्शक तत्वे अटी, शर्ती व नियमांच्या अधिन राहून संस्था मंडळ व शाळा प्रशासनाने सेवाजेष्ठता यादीनुसार कनिष्ठतम कायम शिक्षकांस अतिरिक्त करणे आवश्यक आहे परंतू काही संस्था चालक व मुख्याध्यापकांनी शाळा संहीतेतील अटी, शर्ती व नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्यपणे सेवाजेष्ठ असलेल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरविले असल्याची शिक्षकांची ओरड असून सदर शिक्षकांनी याबाबतची लेखी तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदकडे लेखी स्वरूपात तातडीने सादर करण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सर्वाेतोपरी कटीबद्ध असून संघटना शिक्षकांची पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे मत जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपांडे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरविणे क्रमप्राप्त असले तरी शाळा संहिता १९८१ च्या सेवा शर्ती नियम १२ फ मधील तरतुदीअन्वये सेवाजेष्ठता यादीनुसार संस्थाचालक व्यवस्थापन मंडळ व संबंधीत मुख्याध्यापकाने पारदर्शकपणे कार्यवाही करणे बंधनकारक आहे. परंतू काही संस्था चालक व मुख्याध्यापकांनी आपल्या अधिकार व पदाचा गैरवापर करून तसेच शाळा संहितेमधील सेवा शर्ती, अटी व नियमांचे उल्लंघन करून सेवाजेष्ठता कायम शिक्षकांना अतिरिक्त ठरवित असल्याची शिक्षकांची ओरड असून नियमबाह्यपणे जेष्ठतम शिक्षकाला अतिरिक्त ठरविणे हेन्याय वतर्क संगत नाही.
नियमबाह्यपणे दुटप्पी भूमिका घेऊन कार्यवाही केल्यास या विरोधात संबंधित शिक्षकाला शिक्षणाधिकारी तसेच जो शिक्षक व्यथीत झाला असेल अशा खाजगी शाळेतील कोणत्याही शिक्षक कर्मचाऱ्याला कलम ८ अन्वये रचना केलेल्या न्यायाधिकरणाडे अपील करण्याचा हक्क आहे. त्यामुळे शिक्षकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.

Web Title: Teachers Council Association support teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.