पालकांसह शिक्षकांचे मार्गदर्शन महत्वाचे

By admin | Published: January 21, 2017 12:34 AM2017-01-21T00:34:40+5:302017-01-21T00:34:40+5:30

घरी आई-वडिलांचे मार्गदर्शन व संस्कार लाभते तर शाळेत शिक्षकांकडून शिक्षणाचे धडे मिळते.

Teacher's guidance with parents is important | पालकांसह शिक्षकांचे मार्गदर्शन महत्वाचे

पालकांसह शिक्षकांचे मार्गदर्शन महत्वाचे

Next

केशव बुरडे यांचे प्रतिपादन : गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार सोहळा
भंडारा : घरी आई-वडिलांचे मार्गदर्शन व संस्कार लाभते तर शाळेत शिक्षकांकडून शिक्षणाचे धडे मिळते. विद्यार्थ्यांच्या जीवनात पालकांसोबतच शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मोठे महत्व आहे. विद्यार्थ्यांनी ते आत्मसाद करून यश गाठावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा सत्कार सोहळा घेतला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, शिक्षकनेते रमेश सिंगनजुडे, रमेश काटेखाये, शंकर नखाते, विजया कोरे यांच्यासह सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कश्यप, प्रधान व्यवस्थापक एच.वाय. नंदनवार, संचालक गणेश साळुंखे, नामदेव गभने, किशोर ईश्वरकर, दिनेश घोडीचोर, दिलीप ब्राम्हणकर, विलास टिचकुले, देवराम थाटे, विजयकुमार डोये, नूतन बांगरे, परमानंद पारधी, शैलेश बैस, मुलचंद वाघाये, अविनाश शहारे, विनोद राठोड, दिलीप बावनकर, दिक्षा फुलझेले, संध्या गिरीपुंजे, दुर्गादास भड यांची उपस्थिती होती.
यावेळी जगन्नाथ भोर यांनी, शाळेतून मिळणारे विद्यार्जन हे जीवनात यशोशिखरावर नेते तर घरून मिळणारे संस्कार हे आयुष्यात संस्कारी बनविते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे हे बाळकडू आयुष्य जपावे. अशा सत्कार सोहळ्यामुळे प्रत्येकावर जबाबदारी येते. त्यामुळे सर्वांनी याचा अमुल्य ठेवा आयुष्यात जपावा, असे प्रतिपादन व्यक्त केले.
यावेळी रमेश सिंगनजुडे यांनी शिक्षकांच्या पाल्यांनी घेतलेली आयुष्याच्या शिक्षणातील ही उंच भरारी आहे. त्यांच्या कलागुणांना अशा सत्कार सोहळ्यातून वाव मिळतो. प्रत्येकाने यश गाठण्यासाठी उद्दीष्ठ निश्चित करावे ज्यामुळे त्याची पुर्तता करण्यासाठी अडचण जात नसल्याने प्रतिपादन सिंगनजुडे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन दिलीप ब्राम्हणकर यांनी केले. प्रास्ताविक केशव बुरडे यांनी केले तर आभार किशोर ईश्वरकर यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे दिलीप फटे, संतोष बिसने, संदीप तिवाडे, गुलाब भुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक, पालक व संस्थेचे सभासद यांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Teacher's guidance with parents is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.