विकास विद्यालयात शिक्षकांचा सन्मान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:15+5:302021-09-07T04:42:15+5:30
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुधाकर देशमुख हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण विकास ...
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुधाकर देशमुख हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उद्दल आकरे, उपाध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष विनोद बावनकर, माजी अध्यक्ष युवराज घाटोळे, संचालिका शशिकला आकरे, बारसाबाई मोथरकर हे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. आयुध निर्मानी जवाहर नगर येथून सेवानिवृत्त झालेले संस्था उपाध्यक्ष विनोद बावनकर व उषाताई बावनकर यांचा संस्था व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी गुणगौरव पुरस्कार देण्यात येतो. उत्कृष्ट संचालनासाठी डाकरे व उत्कृष्ट कार्यालयीन व्यवस्थापनासाठी शिक्षकेतर कर्मचारीमधून एन. जी. जौजाळ यांना मान्यवर मंडळींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन घेण्यात आले. उत्कृष्ट मुख्याध्यापक व शिक्षक भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांना पुष्प, श्रीफळ व मिठाई देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उद्द्ल आकरे, विनोद बावनकर यांनी विचार व्यक्त केले. भविष्यात संस्थेला अपेक्षित शाळेचा विकास निश्चित होईल, असा विश्वास प्राचार्य देशमुख यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केला. सुभाष वाडीभस्मे यांनी प्रास्ताविक केले. कराडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चोपकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.