शिक्षकांनो, आता सद्बुध्दीचे धडे शिकवा

By Admin | Published: February 6, 2016 12:40 AM2016-02-06T00:40:34+5:302016-02-06T00:40:34+5:30

देशात भाजपची सत्ता येवून २२ महिन्यांचा कार्यकाळ लोटला आहे. दरम्यान भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा विकास ठप्प आहे.

Teachers, now teach lessons about good values | शिक्षकांनो, आता सद्बुध्दीचे धडे शिकवा

शिक्षकांनो, आता सद्बुध्दीचे धडे शिकवा

googlenewsNext

प्रफुल पटेल यांचे प्रतिपादन    देवनारा येथे जिल्हास्तरीय स्वदेशी खेळोत्तेजक क्रीडा संमेलनाचे उद्घाटन
तुमसर : देशात भाजपची सत्ता येवून २२ महिन्यांचा कार्यकाळ लोटला आहे. दरम्यान भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा विकास ठप्प आहे. भेलचा कारखाना बंद पडला, धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्पाला सुरूवात झाली नाही. आदिवासीयांची खावटी बंद करण्यात आली. दलित गोरगरिबाकरिता नवीन योजना नाही. बावनथडी प्रकल्पाला एक दमडीही अजुनपर्यंत मिळाली नसताना हे कुठून विकास करणार, असा सवाल उपस्थित करित नेमके निवडणुकीच्या वेळी सुशिक्षित लोक सदसदविवेक बुद्धीचा वापर करताना दिसत नाही. आता शिक्षकांनी पाल्यांना तसेच त्यांच्या पालकांना सदबुद्धीचे धडे शिकवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
तालुक्यातील आदिवासी बहुल देवनारा येथे जिल्हास्तरीय स्वदेशी खेळोत्तेजक क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आ. राजेंद्र जैन, अनिल बावनकर, सेवक वाघाये, मधुकर कुकडे, बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती विनायक बुरडे, धनंजय दलाल, मधुकर सांभारे, रामअवतार देवांगण, संगिता सोनवाने, प्रतिक्षा कटरे, संगिता मुंगुसमारे, प्रेरणा तुरकर, रेखा ठाकरे, धनेंद्र तुरकर, देवचंद ठाकरे, दिलीप सोनवाने, ठाकचंद मुंगुसमारे आदी उपस्थित होते.
पटेल म्हणाले, अख्या महाराष्ट्रात केवळ गोंदिया तसेच भंडारा जिल्ह्यातच स्वदेशी खेळोत्तेजक क्रीडा सत्र होत असून खेळाडू निर्माण करण्याकरिता हा एक अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले.
दरम्यान स्वदेशी खेळोत्तेजकाचे ध्वजारोहण करून क्रीडा संमेलनाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, आ. अनिल बावनकर, सेवक वाघाये यांचीही समायोचित भाषणे झाली.
जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिल्लोरकर यांनी जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंना यश चिंतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत जिल्हा कार्यवाह नरेश देशमुख यांनी स्वदेशी खेळोत्तेजक क्रीडा स्पर्धेत फेडरेशनचे नियम लागू केल्याने कदाचित प्रेक्षकांना ते वेगळे वाटु शकते व त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यताही बळावते. त्यामुळे इतरांनी शांततेने खेळाचे आनंद घ्यावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर देवनारा येथील सरपंच राजेश भट यांनीही कार्यक्रमाची प्रास्ताविक केले. संचालन स्वदेशी मंडळाचे शिक्षक शिक्षिका यांनी केले तर आभार महिला बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले यांनी मानले. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणिय होती.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Teachers, now teach lessons about good values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.